आॅनलाईन लोकमतबडनेरा : श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्ग वीटभट्ट्यांच्या विळख्यात सापडला आहे. मार्गालगतच थोड्या-थोड्या अंतरावर दोन्ही बाजूने असणाऱ्या वीटभट्ट्यांच्या धुराळ्याने व त्याच्या उष्म्याने दर्शनार्थी प्रचंड त्रस्त झाले आहे. प्रदूषणाच्या विळख्याने नागरिक व दर्शनार्थींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.बडनेरापासून पाच किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानचा मोठा भक्तवर्ग आहे. निसर्गरम्य वातावरणातील या क्षेत्राच्या ठिकाणी दर रविवारी मोठी गर्दी असते. तसेही नियमित दर्शनासाठी जाणाऱ्यांची मार्गाने रेलचेल असते. या मार्गाच्या अर्ध्या अंतरापर्यंत दोन्ही बाजूने वीटभट्ट्या लावण्यात आलेल्या आहेत. अगदी रस्त्याच्या लागूनच या वीटभट्ट्या आहेत.वीटभट्ट्यांचा धुराळा धोकादायक...: कोंडेश्वर मार्गालगत व जुन्या बायपास मार्गालगत सुरू असणाºया वीटभट्ट्यांचा धुराळा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. मोठ्या संख्येत वीटभट्ट्या असल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागतात. रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या धोकादायक ठरल्या असताना प्रशासन का गप्प आहे, असा सवाल पुढे येतो आहे.
कोंडेश्वर वीटभट्ट्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 10:42 PM
आॅनलाईन लोकमतबडनेरा : श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्ग वीटभट्ट्यांच्या विळख्यात सापडला आहे. मार्गालगतच थोड्या-थोड्या अंतरावर दोन्ही बाजूने असणाऱ्या वीटभट्ट्यांच्या धुराळ्याने व त्याच्या उष्म्याने दर्शनार्थी प्रचंड त्रस्त झाले आहे. प्रदूषणाच्या विळख्याने नागरिक व दर्शनार्थींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.बडनेरापासून पाच किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानचा मोठा भक्तवर्ग आहे. निसर्गरम्य वातावरणातील ...
ठळक मुद्देदर्शनार्थी त्रस्त : प्रशासनाचे दुर्लक्ष, आसमंतात धुराळा