शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

कोतवालीत तक्रार भंडारी, दुबेला अटक

By admin | Published: May 18, 2017 12:03 AM

शासकीय नाहरकत प्रमाणपत्रात कर्मचाऱ्याची नजर चुकवून स्वहस्ताक्षरात ‘हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रुम, पूल’ अशा आस्थापनांची नोंद केल्याच्या

एनओसीवर लिहिले, ‘हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रुम, पूल’लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासकीय नाहरकत प्रमाणपत्रात कर्मचाऱ्याची नजर चुकवून स्वहस्ताक्षरात ‘हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रुम, पूल’ अशा आस्थापनांची नोंद केल्याच्या आरोपावरुन घनश्याम भंडारी (५५, गणेश कॉलनी), अमित दुबे (३५, अंबागेट) यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार करणे, ठकबाजी करणे अशा स्वरुपाचे गुन्हे नोंदवून बुधवारी अटक केली.शहरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरविरुद्ध ‘लोकमत’ने आवाज बुलंद केल्यानंतर सर्वच हुक्का पार्लरवर कारवाईचे आसुड ओढले गेले. सामाजिक स्तरातून असल्या व्यवसायाविरुद्ध घृणा व्यक्त केली गेली. दरम्यान ३ मे रोजी घनश्याम भंडारी यांनी महापालिका आयुक्तांकडे घनश्याम पूल टेबल पार्लर, घनश्याम हुक्का पार्लर, घनश्याम व्हिडिओ गेम पार्लर आणि घनश्याम कार्डरुम पार्लर अशा चार व्यवसायांसाठी नाहरकत प्रमाणपत्रांची मागणी केली. जुन्या अर्जाचा घेतला आधारअमरावती : हे चारही पार्लर मुख्य टपाल कार्यालयाजवळील हॉटेल काशमध्ये चालविले जाणार असल्याचे विनंती अर्जात नमूद केले होते. भंडारी यांचे हे चार अर्ज महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभाग, उपायुक्त नरेंद्र वानखडे आणि त्यांच्याकडून नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांकडे पाठविले गेलेत. सर्व अर्ज नामंजुर केले गेले. भंडारी आणि दुबे यांनी पुन्हा शक्कल लढविली. शहरातील हुक्का पार्लरविरुद्धचे वातावरण बघता राजरोसपणे नाहरकत प्रमाणपत्र मिळविणे अशक्य असल्याचे त्यांनी हेरले. ३० मार्च रोजी या ठकबाजांनी उद्योग तथा वीज वापराकरिता दिल्या जाणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेतील नगररचना विभागात अर्ज केला. त्यात त्यांनी मनोरंजनासाठी ‘क्लब हाऊस आॅर अदर रिक्रिएश्नल अ‍ॅक्टीव्हिटीज, कंडक्टेड अ‍ॅज बिजनेस’ असा उल्लेख केला. मनोरंजनासाठी क्लब हाऊसला परवानगी देण्याची तरतूद असल्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने त्यासाठीचे नाहरकत प्रमाणपत्र जारी केले. या नाहरकत प्रमाणपत्रावर इतर चार पार्लरचा उल्लेख भंडारी आणि दुबे यांनी संगनमताने केला. सर्वच चारही पार्लरला नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याचे भासविण्यासाठी हे षड्यंत्र त्यांनी रचले. कनिष्ठ लिपिकाने भंडारी आणि दुबेंबद्दल तक्रार केल्यानंतर १२ मे रोजीचे फुटेज तपासले त्यात ठकबाजीचा प्रकार उघड झाला. आयुक्तांच्या आदेशाने त्या दोघांविरुद्ध फौजदारी तक्रार करण्यात आली. - सुरेंद्र कांबळे, एडीटीपीअसे फुटले बिंगदुबे आणि भंडारी १२ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास कनिष्ठ लिपिक दिलीप फुलाडी यांच्याकडे गेले. प्रशासनाने क्लब हाऊसला नाहरकत प्रमाणपत्र मंजूर केले होते. तथापि हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्डरुम आणि पूल यासाठीचे प्रमाणपत्र मात्र नाकारले गेले होते. क्लब हाऊसचे नाहरकत प्रमाणपत्र फुलाडी यांनी भंडारी यांच्या हाती दिले. त्यानंतर फुलाडी हे काही कामानिमित्त त्यांची खुर्ची सोडून इतरत्र गेले. फुलाडी यांनी त्यांच्या आलमारीत ठेवलेले फाईल दुबे यांनी काढले. त्यातील नाहरकत प्रमाणपत्राची प्रत काढली. ती भंडारी यांना दिली. भंडारी यांनी त्यावर स्वहस्ताक्षरात ‘हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्डरुम, पूल’ अशा अक्षरांची नोंद केली. हे लिहून होते न होते, तोच फुलाडी परतले. घाई घाईने दुबे याने ते फाईल पुन्हा आलमारीत ठेवले. दोघेही तेथून निघून गेले. जाताना त्यांची भेट फुलाडी यांच्याशी झालीही. हा सर्व घटनाक्रम सदर कक्षात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. आलमारी उघडी दिसल्याने फुलाडी यांना संशय आला. त्यांनी लागलीच दुबे आणि भंडारी यांना शोधण्यासाठी कार्यालयाबाहेर जाऊन बघितले. ते दिसले नाहीत. दुसऱ्या दिवशी फुलाडी यांनी फाईल तपासली. ज्या आस्थापनांची परवानगी महापालिका प्रशासनाने नाकारली त्यांची नोंद नाहरकत प्रमाणपत्रावर झाल्याचे त्यांना दिसले. सीसीटिव्हीत ठकबाजी बंदिस्तअमरावती : प्रकरण कळल्यावर नगररचना सहसंचालक सुरेंद्र कांबळे यांनी १२ मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. घडलेला सारा प्रकार लक्षात आला.आयुक्तांच्या आदेशाने भंडारी आणि दुबे यांच्याविरुद्ध शासकीय दस्तऐवजात खोडतोड केल्याची तक्रार शहर कोतवाली पोलिसात फुलाडी यांच्या सहीने बुधवारी नोंदविण्यात आली. तत्काळ गुन्हे दाखल करुन भंडारी आणि दुबे यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पीआय निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आर.एस. लेवटकर, पोलीस शिपाई मनिष सावटकर यांच्यासह डीबी पथकाने केली.