या आंदोलनात कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करण्यात यावी, अल्प मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांना समान काम, समान वेतन या धोरणानुसार १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, फेब्रुवारी २०१९ मधील शासन निर्णयाप्रमाणे मानधनवाढीला राज्यातील कोतवाल पात्र असूनही एका मार्गदर्शनानुसार कोतवालांना मानधन वाढीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. ते अन्यायकारक नियम रद्द करण्यात यावे, तलाठी व तत्सम संवर्गातील पदे भरताना कोतवालांसाठी ५० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात, शिपाई पदाच्या सर्व जागा या कोतवाल संवर्गातूनच भराव्यात, अशी मागणी यावेळी कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष पंकज पर्बत, उपाध्यक्ष सुमित कदम, सचिव शरद गाढवे, सहसचिव किशोर भाकरे, माया पोहरकर, प्रज्ञा अंभोरे, आशिष इंगोले, विश्वेश्वर पवार, गजेश दुधाट, दीपमाला शिंदे आदींनी केली आहे.
160821\img-20210812-wa0022.jpg
photo