लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी मध्यरात्री एक मनोरुग्ण महिला पोलिसांना दिसली. पोलिसांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. ती बोलण्यास तयार नव्हती. मात्र, तिचे हावभाव ओळखून पोलिसांना तिला जेवण आणून दिले. तिने लगेच जेवणावर ताव मारल्याने ती भुकेने व्याकूळ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनास्थळ गाडगेनगर हद्दीत असतानाही कोतवाली पोलिसांनी ही माणुसकी दाखवून मानवतेचे कर्तव्य निभावले.मनोरुग्ण महिला भटकत-भटकत रात्रीच्या वेळी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील आवारात येऊन बसली होती. या वर्दळीच्या मार्गावर अनेक वाहनांचे आवागमन सुरू होते, मात्र, एकानेही त्या महिलेकडे लक्ष दिले नाही. ती मानसिकरीत्या खचली असली तरी नातेवाईक जबाबदारी टाळत असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. चांगले कपडे परिधान करून असलेली ती महिला कुणाच्या तरी मदतीच्या अपेक्षेत बसली असावी.कोतवाली पोलीस ठाण्यातील ड्युटी आॅफिसर पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता धावडे यांच्यासह डीबीचे प्रमुख पोलीस राजेन्द्र उमक, पोलीस शिपाई नईम, आशिष व काही पत्रकार मंडळी त्या मनोरुग्ण महिलेच्या मदतीला धावून गेले. पोलिसांनी त्या महिलेसाठी जेवणाची सोय करून दिली. त्यानंतर तिला योग्य सहयोग करीत घरी सोडण्यात आले. अनेकदा ठाण्याची हद्द पाहून पोलीस कर्तव्य बजावतात, मात्र, या महिलेच्या मदतीसाठी कोतवाली पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीचा विचार केला नाही. त्या महिलेला मदत करून माणुसकी जोपासली.
कोतवाली पोलिसांची माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:29 AM
इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी मध्यरात्री एक मनोरुग्ण महिला पोलिसांना दिसली. पोलिसांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. ती बोलण्यास तयार नव्हती. मात्र, तिचे हावभाव ओळखून पोलिसांना तिला जेवण आणून दिले.
ठळक मुद्देहद्दीबाहेर कर्तव्य : मनोरूग्ण महिलेस पोहोचविले घरी