अमरावती : एका वर्षापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याचा संताप व्यक्त करीत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मृताच्या मुलाने गोंधळ घालत येथील डॉक्टरांना शिवीगाळ केली. तसेच रुग्णालयात तोडफोड करण्याची भाषा वापरणाऱ्या एका इसमाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना बुधवारी दुपारी कोविड रुग्णालयात घडली. पोलीससूत्रानुसार, वलीम खान पठाण साहेब खान (रा. फरमानपुरा ता. अचलपूर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी डॉ. रूपेश किसनराव खडसे (४२, रा. कोविड रुग्णालय) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. फिर्यादी डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना आरोपीचे वडील १२ सप्टेंबर २०२० रोजी कोरोनाने मरण पावले. आरोपीने वडिलांचा मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांनी दवाखान्यात गोंधळ घातला होता. रुग्णालयाच्या कामात अडथळा आणला तसेच फोनवर डॉ. रविभूषण व सीएस श्यामसुंदर निकम यांना इतर इंनटरनेटवरून रात्री बे रात्री पर्सनल मोबाईलवरून फोन करून शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी देत होता. तसेच तो बुधवारी दुपारी दवाखान्यात आला. शिवीगाळ करू लागला तसेच रुग्णालयातील तोडफोड करण्यास तयार होता. रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांना भडकवित होता. तसेच त्याने शासकीय कामात अडथळा आणला. आरोपीविरुद्ध कलम ३५३,४५२,२९४,५०४,५०६,१०९ नुसार गुन्हा नोंदविला.
कोविड रुग्णालयात डॉक्टरांना शिवीगाळ, रुग्णालयात युवकाचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:11 AM