अंजनगाव सुर्जी : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हीड-१९च्या प्रादुर्भावात महिलांना स्वयं-रोजगाराची संधी या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते २३ जुलै रोजी करण्यात आले. याचे उद्देश जिल्ह्यातील बचत गटातील महिलांच्या मदतीने ८०,००० मास्क बनविणे व मास्क विक्री करणे, २ लाख लोकांपर्यंत कोरोनाबद्दल जनजागृती करणे, कोरोना चाचणीसाठी नोंदणी करून देणे व मायग्रंट/पुअर सपोर्ट सर्विस सेंटर स्थापन करून गरजूंना रोजगार देण्याचा प्रयत्न करणे, हा आहे. त्यानुसार हा कार्यक्रम १३ सप्टेंबर रोजी संजीवनी लोकसंचालित साधन केंद्र अंजनगाव सुर्जी अंतर्गत वानखडे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी), नगरसेविका सुनीता मुरकुटे, मनोहर मुरकुटे व संतोष चिंचोळकर, भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महिला बचत गटातील महिला तसेच संजीवनी लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक अतुल धारस्कर, क्षेत्रीय समन्वयक इम्रान खान, प्रवीण लोंदे, दीपाली रोकडे, शारदा चौरागडे, शिल्पा खंडारे, नीता बारब्दे, शालिनी रहाटे व श्रद्धा नेवारे दीपक दाभाडे, प्रवीण बोडखे, आदी सीएमआरसी स्टाफ उपस्थित होता.
युनिसेफ, मविमतर्फे कोविड जनजागृती, मास्क वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:16 AM