मोर्शी : आरोग्य विभाग व मोर्शी नगरपालिकातर्फे शहर व ग्रामीण भागात फिरत्या पथकांद्वारे रॅपिड अँटिजेन चाचणी शिबिर घेण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होत आहे. मंगळवारी कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये
हे शिबिर आयोजित केले होते. शिबिरात २५२ जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
शिबिरांचे नियोजन वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कळसकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जयस्वाल, नगर परिषद मुख्याधिकारी गीता ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत महाजन, डॉ. सचिन कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. या कार्यात आरोग्य सहायक विनायक नेवारे, विनय शेलुरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश भगत, जितेश ढेवले, गौरी चव्हाण, आरोग्य कर्मचारी योगेश पोहोकार, पवन कडू परिश्रम घेत आहेत. नगर परीषद कर्मचारी राजेश ठाकरे प्रल्हाद दाभोळे, अरविंद दाणे, मोनिल महाजन, राहुल नंदनवार, पोलिस कर्मचारी राजेश बारस्कर, सचिन भगत, सुरेश धुर्वे, गजानन मरकाम, प्रवीण मरकाम व त्यांचे सहकारी या कार्यात मोलाचे सहकार्य करीत आहेत.