शिवसेनेचा उपक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश
अमरावती : कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दररोज सायंकाळी ७ नंतर मोफत जेवण आणि पाण्याची व्यवस्था गत १६ दिवसांपासून अविरतपणे सुरू आहे. कोरोनाकाळात हा स्तुत्य उपक्रम शिवसेनेच्यावतीने राबविला जात आहे.
शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रवीण हरमकर व सक्करसाथ मित्रमंडळीच्यावतीने हा उपक्रम संयुक्तपणे सुरू आहे. कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईंकांना जेवणाची व्यवस्था व्हावी, यासाठी जवाहर गेटच्या आत जुनी कोतवाली परिसरातील ४० ते ५० जणांची चमू नियमितपणे कार्यरत आहे. पोळ्या तयार करणे, भाजीपाला कापणे, जेवण पॅकिंग करणे, वाहनात टाकणे, रुग्णांपर्यत जेवण पोहचविणे अशा विविध कामांची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या वेदना पराकोटीच्या आहेत. तथापि, त्यांच्या प्रतीक्षेत रुग्णालयाबाहेर तिष्ठत असलेल्या नातेवाइकाचे हाल कोण जाणून घेणार, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेना व सक्करसाथ मित्रमंडळीने स्वखर्चातून मोफत जेवण आणि पाण्याची व्यवस्था त्यांच्याकरिता करण्यात येत आहे. दररोज सायंकाळी सुपर स्पेशालिटी, इर्विन व त्यानंतर पीडीएमसी रुग्णालयात कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत जेवण वाटप केले जात आहे.
-------------------
सामाजिक कार्यात यांचेही सहकार्य
कोविड रुग्ण व नातेवाइकांना मोफत जेवण, पाणी या उपक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, आशिष धर्माळे, अनूप पुरवार, पप्पू मुणोत, गोविंद दायमा, मनीष रामावत, संदीप मानेकर, प्रमोद वानखडे, निकेश शर्मा, जुगल दवे, प्रकाश सोनी, राजू भैया, चंदू पिंपळे. विश्वजित मेश्राम, अप्पी जिरापुरे, विजू चांडक, मोहम्मद शफी पहिलवान, प्रवीण माणिकपुरे, गोपाल आसोपा, रोशन कात्रेजा, नितीन अग्रवाल, आशू दलाल. वीरेंद्र ठाकूर, रीतेश आसोपा, रोहित सोमानी, कमलेश गुप्ता, आनंद राठी, राजू हेरे, रामा सोळंके, दिनेश नवाथे, संजय गव्हाणे, मनोज माणिकपुरे, प्रवीण केशरवानी, चेतन व्यास आदींचे मोठे सहकार्य मिळत आहे.
----------------