संसार उद्ध्वस्त : मेळघाटच्या माखल्यात सात घरांची राखरांगोळीनरेंद्र जावरे चिखलदरामंगळवारी सकाळी ११.३० वाजता चुलीतील विस्तवाने अचानक पेट घेतल्याने तालुक्यातील माखला येथे सात घरांसह एक गोठा जळाला. आदिवासींच्या संसाराची राखरांगोळी झाली. झोपडीतील पाकव्यात अडकलेल्या अडीच महिन्यांच्या अनिकेत परसराम मावस्कर या चिमुकल्याला १२ वर्षीय कृष्णा रज्जू बेठेकर या मुलाने पेटत्या झोपडीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. चिखलदऱ्यापासून ३५ किलोमीटर अंतरावरील माखला या गावातील टेंब्रुठाणा येथे अचानक घरांनी पेट घेतला. यात सात घरांसह एका गोठ्याची राखरांगोळी झाली. त्यामध्ये किशोरीलिला रामजी मावस्कर, मुंगीलाल व्हातींग मावस्कर, रामकिसन मुंगीलाल मावस्कर, परशराम मुंगीलाल मावस्कर, काशीराम मुंगीलाल मावस्कर, श्यामलाल रामजी धिकार व शितू रामजी धिकार यांच्या घराचा व गोठ्याचा समावेश आहे. अन् त्याने घेतली आगीत उडीसंकटकाळी धावून येणारा कृष्ण येथेही धावून आला. धु, धु वाऱ्याच्या वेगाने जळणाऱ्या झोपड्या विझविण्यासाठी अख्खे गाव पाणी ओतण्याचे काम करीत होते. झोपडीतील पाळण्यात अनिकेत परसराम मावस्कर हा अडीच महिन्यांचा चिमुकला अडकला होता. या धामधुमीत त्या बालकाच्या रडण्याचा आवाज १२ वर्षीय कृष्णा राजू बेठेकर या मुलाच्या कानावर पडला. कशाचीही तमा न बाळगता त्याने थेट झोपडीत प्रवेश मिळविला. झोपडीतील पाळण्यातून चिमुकल्या अनिकेतला बाहेर काढून प्राण वाचविले. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे हा प्रसंग होता. एकाच परिवाराची चार घरे, २७ सदस्य उघड्यावरमाखला येथील सात घरांपैकी चार घरे ही वडिलासह तीन मुलांची आहेत. त्यामध्ये एकूण २७ सदस्य वास्तव्याला होते. आज मंगळवारी लागलेल्या या आगीत सातही घरांची राखरांगोळी झाली. सर्वांचा संसार उद्ध्वस्त झाला. कपडे, भांडी, धान्य आदी सर्वच वस्तू जळाल्या.
‘कृष्णा’ने वाचविले झोपडीत अडकलेल्या चिमुकल्याचे प्राण
By admin | Published: April 08, 2015 12:18 AM