अचलपूर : नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ शहीद भगतसिंग वाॅर्डातून जाणाऱ्या बायपास मुख्य रस्ता कुंभकर्ण व्हाया जीवनपुरा ते गौघाट स्मशानभूमी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, नगरपालिका प्रशासन कुंभकर्ण झोपेत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात होतात. अचलपूर नगर परिषद क्षेत्रातील नागरिक सरमसपुरा, गांधीपूल, हिरापुरा, विलायतपुरा, बुंदेलपुरा, जीवनपुरा या भागातील नागरिक अमरावती, नागपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, चांदूर नाका येथे जाण्याकरिता याच मुख्य मार्गाचा वापर करतात. आपत्कालीन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांना येण्याकरिता या भागातील नागरिकांकरिता एकमेव हाच रस्ता आहे. हा रस्ता दलित वस्तीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बुंदेलपुरा ते जीवनपुरा भागातील बुद्ध पुतळा असा ॲप्रोच बायपास रोड असून कित्येक वेळा दलित वस्ती निधी अंतर्गत प्रयत्न केले. परंतु प्रशासनाला जाग आली नाही, हे विशेष.
कुंभकर्ण व्हाय जीवनपुरा ते गाैघाट स्मशानभूमी रस्ता खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:09 AM