अमरावती: गोपालनगर भागातील कैलासनगर येथील एका घराच्या खोलीत चालणारा कुंटनखाना राजापेठ पोलिसांनी उध्वस्त केला. बुधवारी दुपारी ४.३० ते ९.३० अशी ही मेगा कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका दलालासह दोन ग्राहकांना अटक करण्यात आली. तर दोन महिलांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तीनही पुरूष आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३७० व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ (पिटा) च्या कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपींमध्ये विशाल पाटील (३०, रा. कैलासनगर), अब्दूल शहा छोटू शहा (२५) व साहिलशहा (२५, दोन्ही रा. हबीबनगर) यांचा समावेश आहे. यातील विशाल पाटील हा त्याच्या घरात कुंटनखाना चालवत असल्याची गोपनिय माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात कैलासनगर येथे धाड टाकण्यात आली. तेथून दलाल पाटील, दोन ग्राहक व दोन महिलांना आपत्तीजनक िस्थितीत पकडण्यात आले. दरम्यान, ग्राहक म्हणून अटक केलेले दोन तरूण युट्युब चॅनेलशी संबंधित असल्याने पोलिसांवर दबावतंत्राचा वापर करण्यात आला. मात्र, त्याला भीक न घालता राजापेठ पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
बाॅक्स
अलिकडच्या काळातील पहिली कारवाई
याआधीही शहरात अनेक ठिकाणी कंटनखान्यावर धाड घालण्यात आली. मात्र, अनेकदा संबंधित मुली, महिलांना समज देऊन व पुरूष आरोपीँविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, पिटा ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तथापि, अशा प्रकरणात बर्याच वर्षांनी कठोर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे पिटा ॲक्टसंपूर्ण देशाला १९५६ साली स्त्रिया आणि बालकांच्या अनैतिक व्यापार रोखणारा कायदा पारीत करण्यात आला. याबाबतच्या कायद्यात २५ हून अधिक कलमे आहेत.
कलम ३ - सदर कायद्याच्या कलम ३ नुसार जागेचा, घराचा, हॉटेलचा अगर चाहनाचा वेश्यागृह
चालविण्यासाठी करण्यात येणाऱ्या वापराबद्दल कमीत कमी १ वर्षे आणि जास्तीत जास्त ३ वर्षाची शिक्षा आणि रू.२०००/- पर्यंत दंडाची तरतूद आहे.
कलम ४ -- सदर कायद्याच्या कलम ४ नुसार वेश्या व्यवसाय करायला लावून त्या कमाईवर
जगणारे संबंधीत मुलीचे पालक, मॅडम, तिला ठेवणारी घरवाली, भडवा यांना ७ ते १० वर्षे सक्त मजुरीच्या शिक्षेची तरतुद आहे. कलम ५ - सदर कायद्याच्या कलम ५ नुसार वेश्या व्यवसायासाठी महिलेस अगर बालिकेस वेश्या
व्यवसाय करायला लावणाऱ्या घर गालकास ७ ते १४ वर्षापर्यंत सक्त मजुरीची तरतुद आहे.
कलम ६ - सदर कायद्याच्या कलम ६ नुसार वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी महिलेस,
बालिकेस, बालकास डांबून ठेवले आणि त्याच्याकडील चीजवस्तू काढून घेतल्यास ७ ते १० वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आहे.
कलम ७ – सदर कायद्याच्या कलम ७ नुसार शाळा, मंदिरे, होस्टेल, हॉस्पिटल, नर्सिंग होम,
त्यांच्या जवळपास कोणी वेश्या व्यवसाय केल्यास ३ महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे.