लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर गाडगेनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी महापालिका कर्मचारी, कामगार संघाद्वारा सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. याबाबत मागण्यांचे निवेदन आयुक्त संजय निपाणे यांना देण्यात आले.महापालिकेच्या अतिक्रमण पथकाद्वारा कॅम्प परिसरात दैनंदिन कार्यवाही सुरू असताना जिल्हा परिषदेसमोरील गोपाल चव्हाण या इसमाची अतिक्रमित पानटपरी उचलत असताना त्याने अर्वाच्च शिविगाळ करून अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे विरोधात खोटी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी देखील वस्तुस्थिती जाणून न घेता अॅट्रॉसीटी सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद केली. हे कामकाजाचे दृष्टीने अंत्य गंभीर बाब आहे. कर्मचारी त्यांचे दैंनदिन कामकाजासाठी फिल्डवर असताना त्यांचे मनोधैर्य खच्ची होऊन याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आली.या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यामध्ये मध्यस्ती करून कर्मचाºयांना यथायोग्य सरंक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. गणेश कुत्तरमारे यांच्यावर दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाºयांशी प्रशासकीय स्तरावर चर्चा करून वस्तुस्थिती जाणून कार्यवाही करावी, अन्यथा कर्मचाºयांना प्रशासकीय कामकाज करणे कठीण होईल. या घटनेमुळे कर्मचारी हादरलेले असून, यातून कर्मचाºयांना सावरण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे संघटनेद्वारे आयुक्तांना निवेदनात म्हटले आहे. यावेळी अध्यक्ष रमेश पांडे, कार्याध्यक्ष मानविराज दंदे, सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.पोलीस आयुक्तांना देणार निवेदनअतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर दाखल अॅट्रॉसिटी बाबतची सत्यता पडताळणी करण्यात येऊन गुन्हे मागे घेण्यात यावे, यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस प्र्रल्हाद कोतवाल यांनी दिली. दरम्यान सोमवारी सायंकाळी महापौर संजय नरवणे व आयुक्त संजय निपाणे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती संघटनेद्वारा कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कोतवाल यांनी सांगितले.
कुत्तरमारेंवर अॅट्रॉसिटी महापालिकेत कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:14 PM
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर गाडगेनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी महापालिका कर्मचारी, कामगार संघाद्वारा सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. याबाबत मागण्यांचे निवेदन आयुक्त संजय निपाणे यांना देण्यात आले.
ठळक मुद्देगुन्हे मागे घेण्याची मागणी : महापालिका कर्मचारी, कामगार संघ आक्रमक