शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

मध्य प्रदेशातील मजुरांची ससेहोलपट

By admin | Published: November 04, 2015 12:17 AM

स्थानिक बाजार समितीचे संत्रा मार्केटमध्ये दरवर्षी मध्य प्रदेशातून शेकडो मजूर पोटाची खळगी भरण्याकरिता मुलाबाळासह येतात.

संसार उघड्यावर : वरूडच्या संत्रा लिलाव मंडईतील प्रकारवरुड : स्थानिक बाजार समितीचे संत्रा मार्केटमध्ये दरवर्षी मध्य प्रदेशातून शेकडो मजूर पोटाची खळगी भरण्याकरिता मुलाबाळासह येतात. यावर्षीसुध्दा शेकडो मजूर महिला, पुरुष आले आहेत. परंतु थंडीच्या दिवसांत बाजार समितीचे बाजूला वास्तव्य करतात. परंतु या मजुरांना बाजार समितीचे भकास झालेल्या खाली यार्डसुध्दा राहण्यास उपलब्ध केल्या जात नसल्याने मजूंराची चांगलीच ससेहोलपट सुरु आहे. परंतु याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.वरुड बाजार समितीच्या संत्रा मंडीच्या आवारात ४६ चे वर संत्रा मंडया आहेत. कोट्यवधी रुपयांच्या संत्र्याची खरेदी विक्री येथे होते. येथून देशाच्या कानाकोपऱ्यात संत्रा पोहोचविण्याचे काम व्यापारी करतात. दिवसागणिक ३० ते ४० ट्रक संत्रा परप्रांतीय बाजारपेठेत पाठविला जातो. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी संत्रा बाजारपेठ आहे. याकरीता मध्यप्रदेशातील खेडयापाडयातून आदीवासी मजूर मोइया प्रमाणावर येतात. यामध्ये महिला, पुरुष तसेच मुली, मुलेसुध्दा येतात. यावर्षी सुध्दा संत्रा भराईकरिता येऊन शेतावर जावून भराई करतात. रात्रीचे वास्तव्य बाजार समितीच्या सभोवताल खाली जागेत उघड्यावरच करतात. त्यांचा संपूर्ण कुटुंबच दिवसरात्र बाजार समितीच्या मागील बाजूस राहतात. परंतु बाजार समितीमध्ये मोठमोठे यार्ड रिकामे असताना यार्डाच्या छताखाली राहण्याची व्यवस्था बाजारसमितीकडून केली जात नाही. शेतकरी, शेतमजूर, हमालाच्या निवासाकरिता सुसज्ज असे निवासस्थाने असताना मजुरांना उघड्यावरच रात्र काढावी लागते. या मजुरांना कोणतीही सुरक्षा मिळत नसल्याने रात्री-बेरात्री मजुरासोबत काही अपप्रवृत्तीच्या लोकांकडून गैरप्रकार तसेच महिलांवर अत्याचार होण्याची शक्यता नागरिकांतून वर्तविण्यात येते. पोटाची खळगी भरण्याकरीता आलेल्या या मजुरांची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. बाजार समितीने धान्य ठेवण्यासाठी उभारलेले यार्ड राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, असेही बोलले जाते. मजुरांची उघड्यावर राहुटी असून कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी ससेहोलपट सुरूआहे. एकीकडे केंद्र सरकारचे ‘हेच काय अच्छे दिन’ आल्याची भाषा बोलणाऱ्या राज्यकर्त्यांना या मजुरांच्या जिवाची पर्वा नाही काय? मजुरांचा वाली कोण, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)