लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार महिन्याच्या कालावधीतील कमी पाऊस व दोन वेळा पावसाचा खंड व परतीचा पाऊसही बेपत्ता यामुळे जिल्ह्यातील हलक्या व मध्यम जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पीक फुलोऱ्यावर येत असताना आर्द्रतेअभावी फुलोर गळायला लागला आहे. पीकदेखील पिवळे पडून ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.जिल्ह्यात आंतरपीख या अर्थानेच तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात खरिपाचे सहा लाख ८४ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असताना १ लाख १३ हजार हेक्टरमध्ये तुरीचे क्षेत्र आहे. यंदा पेरणीपासून पाऊस कमी असल्याने पिकाच्या वाढीवर याचा मोठा परिणाम झाला. याचा थेट परिणाम सरासरी उत्पादनावर होणार आहे. सप्टेंबर व आॅक्टोबर महिण्यातील पावसाचे खंड देखील तुरीला बाधक ठरले आहेत. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्र वगळता अन्य क्षेत्राता तुरीची वाढ फारसी झालेली नाही. आर्द्रता टिकवून ठेवणाऱ्या जमिनी व्यतिरीक्त अन्य जमिनीत तुरीला वातावरणात थंडी व जमिनीत ओलावा आवश्यक आहे. यंदा मात्र, याचा अभाव असल्याने तुरीच्या सरासरी उत्पादनात किमान २५ ते ४० टक्कयांनी कमी येण्याची भिती निर्माण झालेली आहे.तुरीचे तालुकानिहाय पेरणीक्षेत्रजिल्ह्यात तुरीचे १ लाख ९२ हजार ८१२ हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ८ हजार ३४१ हेक्टर, चिखलदरा २ हजार ८९५, अमरावती ८ हजार ६४०, भातकुली ९ हजार ७५१, नांदगाव खंडेश्वर ९ हजार २१२, चांदूर रेल्वे ७ हजार ५०, तिवसा ४ हजार ९४६, मोर्शी ९ हजार ९०६, वरूड ७ हजार २९७, दर्यापूर १२ हजार १३२, अंजनगाव सुर्जी ६ हजार ९७३, अचलपूर ८ हजार १६, चांदूर बाजार ५ हजार ९१३ व धामणगाव तालुक्यात ८ हजार २०९ हेक्टर क्षेत्र आहे.उत्पादनात घट होण्याची कारणेसुरुवातीला पाऊस उशिरा; नंतर खंड. यामुळे तूर वाढीला पुरेसा कालावधी मिळाला नाहीफुलोºयावर असताना पाऊस नाही, जमिनीत आर्द्रतेचा अभाव, यामुळे झाडे पिवळी पडून फुलोर गळत आहे.सद्यस्थितीत तुरीला आवश्यक असणारी थंडी नाही. त्यामुळे पिकांवर अळी व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे.या प्रतिकुल परिस्थितीत शेंगा पोचट, दाणा बारीक होणे व किडीमुळे सरासरी उत्पादनात कमी येणार आहे.उपाययोजनातूर फुलोऱ्यांवर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना संरक्षित सिंचन हवे. १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरीयाची फवारणी करताना यामध्ये ग्रेड-२ ही सुक्ष्मअन्नद्रव्ये १० लिटर पाण्यात ७० ग्रॅम टाकावे किंवा पॉनोफिक्स ४ मिलि टाकावे. तुरीवर ‘मर’ आलेली झाडे उपटूून नष्ट करावी तसेच करप्यासाठी २५ ग्रॅमक कॉपर आॅक्सीक्लोराइड १० लिटर पाण्यात मिसळून व स्टिकर मिसळून प्रामुख्याने खोडांवर फवारणी करावी, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले.
जमिनीत आर्द्रतेचा अभाव; तुरीवर ‘मर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 9:22 PM
चार महिन्याच्या कालावधीतील कमी पाऊस व दोन वेळा पावसाचा खंड व परतीचा पाऊसही बेपत्ता यामुळे जिल्ह्यातील हलक्या व मध्यम जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पीक फुलोºयावर येत असताना आर्द्रतेअभावी फुलोर गळायला लागला आहे. पीकदेखील पिवळे पडून ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : हलक्या, मध्यम जमिनीतील पिके पिवळी