अमरावती : येथील जयस्तंभ चौक ते सरोज चौकापर्यंत काँक्रिटीकरणाचा रस्ता करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी नाली खोदण्यात आली आहे. त्यावर स्लॅब टाकण्याचे कामे मंदगतीने सुरू असून, आणखी नागरिकांना किमान तीन आठवडे त्रास सहन करावा लागणार आहे. कारण एप्रिल एंडींगपर्यंत सदर कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.सदर रस्ता हा महानगरपालिके चा असून हे सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहेत. जयस्तंभ ते सरोज चौकापर्यंत ४५० मीटर लांबीचा काँक्रिटीकरणाचा या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात आले. तेथे दोन्ही बाजूला सांडपाणी निचऱ्यासाठी मोठी नाली व त्यावरील स्लॅब व नाली व रस्त्याच्या मधोमध पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे कामे आहे. परंतु या ठिकाणी रस्त्याचेच कामे अनेक महिने चालले. यानंतर या ठिकाणी नालीने खोदकाम करण्यात आले परंतु पुढील कामांचे नियोजनच नाही. या मार्गावर अनेक व्यावसायिक आहेत. नालीचे कामे चालू असल्याने त्याचा परिणाम व्यवहारावर होत आहे. या ठिकाणी कुठल्याही व्यवसायिकाकडे पार्किंगला जागा नसल्याने व नालीचे कामे सुरू असल्याने या ठिकाणी दोन्ही बाजुला पार्किंगसाठी दुचाकी व चारचाकी वाहने ठेवल्या जात असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते.रस्त्याचे कामे पूर्ण झाले आहे. नालीवरील स्लॅबचे कामे पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत.- सुहास शिरभाते, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती
तीन कोटींच्या रस्ता, नाली बांधकामात नियोजनाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:25 PM
येथील जयस्तंभ चौक ते सरोज चौकापर्यंत काँक्रिटीकरणाचा रस्ता करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी नाली खोदण्यात आली आहे. त्यावर स्लॅब टाकण्याचे कामे मंदगतीने सुरू असून, आणखी नागरिकांना किमान तीन आठवडे त्रास सहन करावा लागणार आहे.
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : कामाची गती मंदावली, नागरिक त्रस्त