शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

लाडाची लेक सीमेवर लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 5:00 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सैन्यात महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांसारखीच संधी, लाभ मिळतील. ज्यात पद, पदोन्नती आणि निवृत्तिवेतन यांचा समावेश असेल आणि त्यांना अधिक काळ सेवा देण्याची परवानगी दिली जाईल, सध्या महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्धारे समाविष्ट केले जाते. जे त्यांना १४ वर्षांपर्यंत काम करू देते. केवळ सैन्याच्या कायदेशीर, शैक्षणिक शाखांमध्ये कायमस्वरूपी कमिशनची परवानगी देण्यात आली आहे.

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चीन, रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इस्राईल आणि युनायटेड स्टेट्स, भारत अशा  मोजक्याच देशांत सैन्यामध्ये मुलींना स्थान प्राप्त झाले आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)ची प्रवेश परीक्षा देण्याची संधी मिळाली असून, त्यांना थेट सीमेवर लढता येणार आहे. देशाच्या लष्करात हल्ली वैद्यकीय, कायदेशीर, शैक्षणिक, सिग्नल आणि अभियांत्रिकी शाखांसारख्या निवडक क्षेत्रांत महिलांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सैन्यात महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांसारखीच संधी, लाभ मिळतील. ज्यात पद, पदोन्नती आणि निवृत्तिवेतन यांचा समावेश असेल आणि त्यांना अधिक काळ सेवा देण्याची परवानगी दिली जाईल, सध्या महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्धारे समाविष्ट केले जाते. जे त्यांना १४ वर्षांपर्यंत काम करू देते. केवळ सैन्याच्या कायदेशीर, शैक्षणिक शाखांमध्ये कायमस्वरूपी कमिशनची परवानगी देण्यात आली आहे.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?स्वतंत्र भारतात १९५८ पासून मुलींना सैन्यात भरती होण्यासाठीचा कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र, सैन्यात मुलींना सीमेवर लढण्यासाठी पाठविले जात नाही. मात्र, न्यायालयाने लिंगाच्या आधारावर त्यांच्या  क्षमतेवर शंका घेणे, हे केवळ महिला म्हणून त्यांच्या सन्मानालाच नव्हे तर भारतीय लष्कराच्या सदस्यांना मानसिकदृष्ट्या ते शिकविले गेले नाही, अशी टीका केली.पारंपरिक पुरुषांच्या बुरुजामध्ये लिंगसमानतेच्या दिशेने वाटचाल दर्शविणाऱ्या सर्व महिला अधिकाऱ्यांना  कायमस्वरूपी सेवा, जी आतापर्यंत फक्त पुरुषांना लागू आहे, ती वाढविण्याचे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने दिले.

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार !मुलीसुद्धा मुलांपेक्षा कमी नाहीत, हे अनेकदा पुढे आले आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने लष्करात भरती होऊन थेट सीमेवर लढण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली आहे. देशसेवेचे हे मोठे कार्य ठरेल.’- मृदुला आडे, एनसीसी

भारतीय राज्यघटनेचा पाया हा समानतेवर आधारित आहे. त्यामुळे लष्करात महिलांना समान संधी देण्याचा निर्णय योग्य आहे. भविष्यात या निर्णयामुळे अनेक मुली संधीचे सोने करतील आणि देशासाठी कर्तव्य बजावतील.- भक्ती देशमुख, एनसीसी

सैन्यात समानता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिशय चांगला ठरणारा आहे. आता महिलांना लढाऊ भूमिकांमध्ये तैनात करण्यात येणार आहे. एनसीसी हे लष्करात करिअर करण्यासाठीचे प्लॅटफाॅर्म ठरेल.- लावण्या सावरकर, एनसीसी

लष्करात प्रवेशासाठी....या निर्णयाने मुलींना सैन्यात भरती होऊन गरुडझेप घेण्यासाठीचे दारे खुले केले आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए, आयएमए आणि ओटीए अशा तीन माध्यमांद्धारे लष्करात प्रवेश करता येणार आहे. 

शहरात एनसीसीच्या ३८० मुलीशहरातील इयत्ता आठवी व नववीच्या ३८० मुली एनसीसीत सहभागी आहेत. सध्या कोरोना संसर्गामुळे एनसीसी परेड, सराव, आदी बाबी बंद असल्या तरी देशाभिमान बाळगणाऱ्या मुलींनी एनसीसी कॅडेट कोअरमध्ये प्रवेश केला आहे.

 

टॅग्स :Soldierसैनिक