अमरावती : लेडी सिंघम म्हणून खात्यात ओळख असलेल्या अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 'कोविड वुमन वॉरिअर्स द रिअल हीरो' या पुरस्काराने रविवारी गौरविण्यात आले.
औरंगाबादच्या ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सोलापूरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मुंबईच्या डीसीपी (प्रतिनियुक्ती इंटिलिजन्स ब्युरो) नियती ठाकर यादेखील या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.सदर कार्यक्रम दिल्ली येथील विज्ञान भवनात पार पडला.
आरती सिंह नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना मालेगाव येथे कोविडचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यांनी तेथे निर्भयपणे कार्य केले व परिस्थिती नियंत्रणात ठेवली, त्या कार्याची दखल प्रथम राज्य शासनाने घेतली होती. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या कार्याची राज्य शासनाकडून केंद्र शासनाने माहिती घेऊन त्यांची कार्याची पावती म्हणून त्यांना 'कोविड वुमन वॉरिअर्स द रिअल हीरो' त्यांना रविवारी या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.