लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या स्थापनेच्या तब्बल २९ टर्मनंतर स्थायी समितीत पहिल्यांदाचा महिला सभापतीची निवड करण्यात आलेली आहे. जागतिक महिला दिनाचे एक दिवसपूर्व भारतीय जनता पक्षाच्या राधा कुरील यांची शुक्रवारी स्थायी समितीच्या सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. या विशेष सभेत विरोधी सदस्य अनुपस्थित राहिले.या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल होते. सकाळी ९ ते १०.३० या वेळात भाजपच्या राधा कुरील यांचेच दोन अर्ज आले. या अर्जाची छाननी करण्यात येऊन एक अर्ज बाद करण्यात आला. एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे पीठासीन अधिकारी यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. कुरील या प्रभाग क्र. १२ रुख्मिनीनगर प्रभागाच्या सदस्य असून, अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवडीची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे व फटाक्याच्या आतषबाजीने या निवडीचे स्वागत केले.गुरुवारी सभापतीपदासाठी सभागृह नेता सुनील काळे यांनी दोन उमेदवारी अर्ज व विरोधी पक्षनेता बबलू शेखावत व एमआयएमचे शेख इमरान यांनी प्रत्येकी एक अर्जाची उचल केली होती. शुक्रवारी विहित मुदतीत मात्र, राधा कुरील यांचेच दोन अर्ज नगरसचिव मदन तांबेकर यांना प्राप्त झाले होते. शहर भाजपचे कोअर कमिटीने चार नावे मुंबईला प्रदेशाकडे पाठविली होती. त्यानुसार सकाळी कुरील यांचे नाव निश्चित करण्यात आले. अर्ज सादर करताना कुरील यांच्या सोबत शहराध्यक्ष किरण पातूरकर, उपमहापौर कुसूम साहू, पंचफुला चव्हान, नीता राऊत, सुमती ढोके, अनिता राज आदी पदाधिकारी उपस्थित होते. विशेष सभेत प्रशासनाच्यावतीने नगरसचिव मदन तांबेकर व नंदकिशोर पवार यांनी पिठासीन अधिकाऱ्यांना सहकार्य केले.विशेष सभेला विरोधी सदस्य अनुपस्थितस्थायी समिती सभापती निवडीच्या सभेला विरोधी पक्षाचे शेख इमरान अब्दूल सईद वगळता सुगराबी भोजा रायलीवाले, प्रदीप हिवसे, सलीम बेग, सुनीता भेले अनुपस्थित होते. एमआयएमचे अब्दूल नाजीम पोलीस प्रकरणात पसार असल्याने तेदेखील अनुपस्थित होते. स्थायीची पुढच्या आठवड्यात बैठक बोलावण्यात येणार आहे. यामध्ये आयुक्तांद्वारा यंदाचा अर्थसंकल्प सादर केलय जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.महापौरपदापासून हुलकावणीयापूवीचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गातील सदस्य राधा कुरील यांनी दावेदारी केली होती. मात्र, महापौरपद हे संजय नरवणे यांना देण्यात आले. त्यानंतर स्थायीसमितीत त्यांना स्थान देण्यात आले तर सभापतीपदासाठी व त्यानंतरच्या महापौर पदासाठी पुन्हा हुलकावनी मिळाली. या टर्मचे सभापतीपद त्यांना देण्यात आले.पतीच्या तोकड्या पगारात महिला घर सांभाळू शकत असल्याने आपणही महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना योग्य प्रकारे कारभार सांभाळू.- राधा कुरील,सभापती, स्थायी समिती
‘स्थायी’त महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 11:24 PM
गुरुवारी सभापतीपदासाठी सभागृह नेता सुनील काळे यांनी दोन उमेदवारी अर्ज व विरोधी पक्षनेता बबलू शेखावत व एमआयएमचे शेख इमरान यांनी प्रत्येकी एक अर्जाची उचल केली होती. शुक्रवारी विहित मुदतीत मात्र, राधा कुरील यांचेच दोन अर्ज नगरसचिव मदन तांबेकर यांना प्राप्त झाले होते. शहर भाजपचे कोअर कमिटीने चार नावे मुंबईला प्रदेशाकडे पाठविली होती. त्यानुसार सकाळी कुरील यांचे नाव निश्चित करण्यात आले.
ठळक मुद्देभाजपच्या राधा कुरील सभापती : महापालिकेत पहिल्यांदा संधी