शहरातील न्यायालयाच्या व तहसील कार्यालयाच्या मागील बाजूला काही मोठ्या व्यावसायकांची घरे आहेत. राष्ट्रीय महामार्गावरूनच दिसणारे वहीदखान यांच्या घरी शुक्रवारी चोरी झाली. सायंकाळी ७:३० ते रात्री १० वाजतादरम्यान ते बाहेर गेले होते. परत येताच घराचे दार उघडे दिसले. दोन्ही रूममधील कपाट फुटलेले दिसले. कपाटातील सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम दोन लाख ५० हजार चोरांनी लंपास केले. घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काहीच आढळले नाही. घराच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेराची बाजू बदलली होती. घरातील पिशवीत ठेवलेले एक लाख रुपये चोरट्यांच्या हाती न लागल्याने ते वाचले. फिर्यादी अदीलखान वहीदखान (रा. मोहमदिया नगर) यांच्या तक्रारीवरून दागिने व रोख अडीच लाख रुपये असा एकूण ५ लक्ष ३७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास झाला असून पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काईट, उपनिरीक्षक इम्रान ईमानदार, उपनिरीक्षक मेशरे, हवालदार प्रमोद फालके, डीबी स्कॉडचे शेवतकर , राठोड तपास करीत आहेत.
अंजनगाव येथे लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:16 AM