व्यापारीही गारद : चुकीच्या शासन धोरणाचा परिपाकचांदूरबाजार : बाजारपेठेत तुरीच्या भावाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना नुकसान झेलावे लागत आहे. १५ जुलैपर्यंत ८ हजार ते ९ हजारांपर्यंत भाव असलेल्या तुरीला घसरणीचा जोर चढला आहे. दीड महिन्यात तुरीचे दर ९ हजारांवरून साडेपाच ते सहा हजार रुपयापर्यंत खाली घसरला आहे. परिणामी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.मागील वर्षी जुलै-आॅगस्ट २०१५ यादरम्यान बाजारपेठेत तुरीचे दर १२ ते १३ हजारपर्यंत पोहोचले होते. याचा विचार करून याहीवर्षी त्यादरम्यान हेच भाव मिळतील, ही अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्री रोखून धरली. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला माल भाव वाढेल या अपेक्षेने ठेवून शेतकऱ्यांनी तूर विक्री रोखून धरली. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल भाव वाढेल या अपेक्षेने वेअर हाऊसमध्ये ठेवून त्यावर बँकांच्या कर्जाचीही उचल केली आहे. ऐन हंगामात तुरीला भाव मिळून आपला खरीप हंगाम चांगल्या तऱ्हेने उभा करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी केली होती. मात्र त्यांची अपेक्षाभंग झाली आहे. उलट या तुरीवर उचलेले बँकेचे कर्जही आजचे भाव पाहता फेडता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतमालाचा ट्रेडींग करणाऱ्या व्यापारांनाही तुरीच्या दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होईल, असे अपेक्षित नव्हते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुरीच्या दराचा अंदाज घेता व्यापाऱ्यांनी नफा मिळविण्याचा दृष्टीने बाजारपेठेत विक्रीस आलेला तुरीचा माल नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने जून २०१६ पर्यंत खरेदी करून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. अनेक व्यापाऱ्यांकडे ५०० ते २ हजार क्विंटलपर्यंत तुरीची साठवून ठेवलेली आहे. प्रतिक्विंटल झालेले तीन हजार रुपयाचे नुकसान पाहता व्यापाऱ्यांनाही कोट्यवधींचा फटका बसला आहे. तुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होऊनही बाजारपेठेत तुरडाळीचे दर मात्र १२० रुपयांच्या आसपास आहेत. आजचे तुरीचे दर पाहता बाजारात तूरडाळीचा दर ८५ ते ९० रुपयेच असायला पाहिजे होता. त्यामुळे हजारो कोटींची लाखो टन तूरडाळ आयात करूनही सरकारकडून सामान्य नागरिकांना डाळीचे भाव स्थिर ठेवण्यात यश आलेले नाही. शासनाचा या चुकीच्या आयात धोरणात शेतकऱ्यांचे व व्यापारींचे मरण होत आहे. शासकीय बगळ्यांमुळे दालमिल व्यापारीही तूर खरेदी करताना साठवणुकीचा विचार न करता आवश्यक तेवढाच माल खरेदी करीत आहे. परिणामी बाजारपेठेत तूर खरेदीची चढाओढ इतिहासजमा झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तुरीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना लाखोंचा फटका !
By admin | Published: August 26, 2016 12:18 AM