शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पर्यटनासोबतच लक्ष्मीची पावले

By admin | Published: January 03, 2016 12:37 AM

वयाच्या पन्नाशीत कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या पर्यटन व्यवसायाला सुरुवात करून पर्यटन व्यवसायावर केसरीची नाममुद्रा कोरली आणि लक्ष्मीची पावले घरात शिरली, ....

केसरी पाटील : ‘शोध मराठी मनाचा’मध्ये उलगडला प्रवास अमरावती : वयाच्या पन्नाशीत कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या पर्यटन व्यवसायाला सुरुवात करून पर्यटन व्यवसायावर केसरीची नाममुद्रा कोरली आणि लक्ष्मीची पावले घरात शिरली, अशा शब्दांत केसरी टुर्सचे संस्थापक आणि चेअरपर्सन केसरी पाटील यांनी जीवनपदर उलगडले. भारतातील आणि परदेशातील रंजक प्रेरक, प्रेक्षणीय तसेच रमणीय स्थळांचे दर्शन घडविताना त्यांनी व्यवसाय काटेकोरपणा आपुलकीने जपला. शिस्तबद्ध, परिपूर्ण नियोजन आणि नावीन्यपूर्ण कल्पकतेचा संयोग घडवून पर्यटन उद्योगात ‘केसरी’ या नावाला वलय प्राप्त झाल्याचे केसरी पाटील यांनी सांगितले. पर्यटन उद्योगातून मिळविलेल्या समृद्धीचा वापर समाजहितासाठी व्हावे यासाठी त्यांनी केसरी आर्ट अ‍ॅन्ड कल्चर फाऊंडेशनची स्थापनाही केली आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक मराठी अकादमीच्या संमेलनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवसी ‘लक्ष्मीचे पावले’ या सत्रात केसरी पाटील आणि उद्योजक मोहन गोरे यांनी विद्यार्थ्यांसमोर जीवनपट उलगडला. ८ जून १९८३ साली केसरी ट्रॅव्हल्स सुरू झाली. १०० चौरस फुटाच्या जागेत कार्यालय सुरू झाले व पुढे ‘गुडविल’च्या भरवशावर ‘एम्पायर’ उभे करण्यात आपण यशस्वी झालो. कामात देवत्व शोधण्याचा गुण आपल्यात होताच असे सांगत गरिबीला आव्हान म्हणून स्वीकारा, भाऊबंदकी हा महाराष्ट्राचा पाचवीला पुजलेला शाप आहे, असे अधोरेखित करत मेहनतीला कुठलाही पर्याय नसतो, असा गुरुमंत्र त्यांनी दिला. (प्रतिनिधी) कामाआधी यश येत नाही इंग्रजी डिक्शनरीमध्ये ‘वर्क’ आधी ‘सक्सेस’ येत असले तरी प्रत्यक्षात कामातही यश येत नाही, काम करून दाखवावेच लागते, अशा शब्दांत सुप्रसिद्ध उद्योजक मोहन गोरे यांनी यशाचा मार्ग अधोरेखित केला. १९४४ साली वडिलांच्या व्यवसायाला अवकळा आली. मात्र त्यानंतर पुढे कष्ट करून इंजिनियरिंग केले. उद्योजक म्हणून मिळविलेले यश काबाडकष्टातून मिळविले असल्याचे ते म्हणाले. गरीब नसाल तर श्रीमंत कसे व्हाल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारून उत्तरही देऊन टाकले. गुडविल महत्त्वाचे - पुसदकर ‘लक्ष्मीचे पावले’ या सत्रात नितीन केळकर हे केसरी पाटील आणि मोहन गोरे यांची मुलाखत घेताना रामदास फुटाणे यांनी अमरावतीकर सोमेश्वर पुसदकर यांनाही बोलते केले. कुठल्याही व्यवसायात, समाजसेवेत, अन्य कुठल्याही क्षेत्रात ‘गुडविल’ महत्त्वाचे; लक्ष्मीची पावले इतरांच्या घरी गेलीत की ती आपल्या घरी आपोआप येतात, असे सांगत सोमेश्वर पुसदकर यांनी राजकारण आणि समाजकारणातील ‘कार्यकर्ता’ उलगडला.