लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जीवनवाहिनी ‘लालपरी’ अमरावती व बडनेरा बस स्थानकाहून ५ ऑगस्टपासून प्रवासी वाहतूक करणार आहे. कोरोनामुळे चार महिन्यांपासून शहरातून बसफेरी बाहेर गेलेली नाही.लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत्या. आता या दोन्ही बसस्थानकांहून ५ ऑगस्टपासून जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या बसफेºया सोडल्या जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. यासंबंधी परिपत्रकही त्यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना जारी केले. परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतून नजीकच्या तालुक्यांमध्ये २२ मेपासून बस धावत आहेत. त्यानंतर आता अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व बडनेरा आगारातून बसफेऱ्यांबाबत नियोजन करण्यात आलेए. प्रवाशाचा प्रतिसाद पाहून या बसेस तालुक्यापर्यत सोडल्या जाणार आहेत. याला प्रतिसाद मिळाल्यास बसफेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. याशिवाय एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशांचीच वाहतूक केली जाणार आहे. याकरिता आवश्यक चालक व तेवढेच वाहक तैनात करण्यात आले आहेत. बसफेऱ्या सुरू होणार असल्याने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. चार महिन्यानंतर प्रवासी वाहतुकीचे अधिकृत साधन नागरिकांना उपलब्ध झाले. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना प्रवास करावा लागणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले.प्रवाशांची ने-आण होती बंदअमरावती व बडनेरा परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने महापालिकेचा हा परिसर ‘रेड झोन’ घोषित करण्यात आला होता. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून दोन्ही आगार व शहरातून एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली होती. आता मात्र या बस स्थानकाहून बस धावणार आहेत.दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील सहा आगारांमधून बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, अमरावती व बडनेरा आगार व शहरातून बस बंद होत्या. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने कोरानासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करून दोन्ही आगारांतून बस फेºया सोडल्या जातील.- श्रीकांत गभणेविभाग नियंत्रक
मध्यवर्ती स्थानकाहून धावणार ‘लालपरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 5:00 AM
लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत्या. आता या दोन्ही बसस्थानकांहून ५ ऑगस्टपासून जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.
ठळक मुद्देआजपासून प्रारंभ : चार महिन्यांपासून वाहतूक बंद