शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत निघाली ८५ दिव्यांची धेंडाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:39 PM

पश्चिम वऱ्हाडाची परंपरा असलेली धेंडाई दिवाळीच्या रात्री मोर्शी शहरातून काढण्यात आली. येथील धेंडाईला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे.

ठळक मुद्देचार मंडळांनी जोपासली परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम वऱ्हाडाची परंपरा असलेली धेंडाई दिवाळीच्या रात्री मोर्शी शहरातून काढण्यात आली. येथील धेंडाईला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे. पंचक्रोशीतील शेकडो नागरिक यात सहभागी झाले.दिवाळीच्या रात्री दिव्यांची आरास मांडून त्याची पूजा केली जाते. घरोघरी ही दिव्याची धेंडाई फिरवून अंधारावर, अज्ञानावर, गरिबीवर मात व्हावी, यासाठी प्रार्थना केली जाते. मोर्शीमध्ये धेंडाईची चार मंडळे आहेत. पहिली धेंडाई निघते, ती श्री समर्थ रामजीबाबा संस्थान माळीपुरा येथून. सर्वात जुनी धेंडाई म्हणून ती ओळखली जाते. दुसरी धेंडाई सुलतानपुरा येथील बजरंगबली संस्थानातून निघाली. तिसरी धेंडाई माळीपुऱ्याच्या दिव्यज्योती धेंडाई मंडळाची निघाली. चौथी धेंडाई माळीपुरा येथीलच महादेवराव गहुकार यांच्या घरून निघाली होती.

अशी असते धेंडाईधेंडाई ही संपूर्ण लाकडापासून बनविलेली असते तसेच तिचा आकार हा एखाद्या पालखीप्रमाणे असतो. दोन माणसांना उचलता येईल अशी समोर व मागे काठ्याची व्यवस्था करण्यात आलेली असते. या धेंडाईमध्ये एकूण ८५ दिवे लावलेले असतात. लोक रात्रभर पारंपरिक चालीत धेंडाईची गाणे म्हणत असतात. धेंडाईच्या गाण्यामध्ये प्रामुख्याने गायीचा व कृष्णलीलेचा समावेश असतो. या गाण्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, ही गाणी कोठेही लिहिलेली नाहीत. धेंडाईची गाणे पूर्णत: मुखोद्गत असणारी मंडळी मोर्शीत आहेत.माध्यमांकडून बेदखलचारशे वर्षांचा इतिहास असलेली पारंपरिक धेंडाई केवळ मोर्शीत काढली जाते. मात्र, अजूनपर्यंत कोणत्याही माध्यमाने याची दखल घेतलेली नाही, अशी खंत गावकरी व्यक्त करतात. धेंडाईसोबत परिसरातील लोक ‘कुपची काठी कुपची जळ, गायी म्हशीन वाडेभर, गायी म्हशीनं भरले वाडे, विघ्न नामाने उडाले’ अशी पारंपरिक गाणे गातात. धेंडाईसोबत वामनराव रडके, वसंतराव मनगटे, मोहनराव घाटोळ, अरुण मडघे, दिलीप ढोरे, उमेश मनगटे, शेषराव मेंढे, राजू मगर्दे, नामदेवराव मगर्देे, किशोर बहाद्दूरकर, उमेश मिसळे, संदीप खेरडे, रविंद्र कुबडे, किशोर बनसोड, सुरेश दरवाई, प्रकाश कांडलकर, अरुण मनगटे, विजय गोहाड, माणिकराव कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Diwaliदिवाळी