सायवाडा शिवारातून दुचाकी लंपास
मोर्शी : रखवाली करण्याकरिता शेतात गेलेल्या इसमाची एमएच २७ टीसी ४३०१ क्रमांकाची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. ही घटना सायवाडा पिंपरी रोड स्थित शेतात १९ सप्टेंबर रोजी रात्री घडली. अनिल रामराव कुमरे (४५, रा. अंबाडा) यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------
ब्राह्मणपुरी येथून दुचाकी लंपास
वरूड : लॉक केलेली एमएच २७ एएल ८१४८ क्रमांकाची १० हजारांची दुचाकी ब्राह्मणपुरी येथून अज्ञाताने लंपास केली. भूषण गणोरकर (३२, रा. ब्राह्मणपुरी) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
---------------------
अल्पवयीन मुलीला आणल्याचे सांगताच आईला मारहाण
वरूड : अल्पवयीन मुलीला घरी आणल्याचे सांगितल्याने आईला वाद करून काठीने मारून जखमी केल्याची घटना रोशनखेडा येथे १९ सप्टेंबर रोजी रात्री घडली. महिलेच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आरोपी राजेंद्र बाबूराव इरपाची विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------
कंपनीचा बोधचिन्ह वापरून साहित्य विक्री
वरूड : एका कंपनीचे बोधचिन्हाचा वापर करून साहित्य विक्री केल्याचा प्रकार २० सप्टेंबर रोजी सराफा लाईन येथे उघड झाला. सोहमसिंग श्रीमन्नोसिंग सेंगर (रा. अनेपूर थाना कोतवाली ता. औरया उत्तर प्रदेश) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आरोपी दीपक रामचंद्र गुल्हाने (६८), ललित दीपक गुल्हाने विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------
चारचाकीची दुचाकीला धडक, एक गंभीर
शेंदूरजना घाट : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत एमएच २७ के २२५८ चा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना तिवसा घाट ते वरूड मार्गावरील ताज मंडईसमोर १९ सप्टेंबर रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून शेंदूरजना घाट पोलिसांनी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०४ ईएस २१२५च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------------
शेतीच्या वादातून भावाला सळाख मारली
मंगरुळ चवाळा : शेतीच्या वादातून कपाळावर सळाख मारून जखमी करण्यात आले. अनिल नामदेव राऊत (३३, रा. खेड प्रिंप्री) याच्या तक्रारीवरून मंगरुळ पोलिसांनी संजय नामदेव राऊत (४०) व एक महिला (रा. खेड प्रिंप्री) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------