शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

विदर्भातील करोडोंच्या भूदान जमिनी शिक्षण संस्थांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:40 AM

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीदरम्यान दानात मिळालेल्या जमिनींपैकी भूदान यज्ञ मंडळाने विदर्भातील २०.८० हेक्टर जमीन अधिनियमाला हरताळ फासून चक्क शिक्षणसंस्थांना वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देअधिनियमाला बगलभूदान यज्ञ मंडळाला महसूल अधिकाऱ्यांचेही बळ

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीदरम्यान दानात मिळालेल्या जमिनींपैकी भूदान यज्ञ मंडळाने विदर्भातील २०.८० हेक्टर जमीन अधिनियमाला हरताळ फासून चक्क शिक्षणसंस्थांना वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २०१४ ते १८ या काळात आठ शिक्षण संस्थांना वाटप करण्यात आलेल्या या जमिनींचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे.विशेष असे की, भूदान मंडळाकडून केली जाणारी नियमबाह्य कामे रोखण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर होती, त्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनीही नियमांचे उल्लंघन करून सदर संस्थांच्या नावे फेरफार नोंदवून घेतले. भूदान यज्ञ मंडळ, लाभार्थी शिक्षण संस्था आणि महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी संगनमताने भूदान कायद्याला मूठमाती दिल्याचे या प्रकरणातून उघड होते. शासनाने यासंबंधाने खोलवर तपास केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होणार आहेत.

काय म्हणतोे नियम?भूदान यज्ञ अधिनियम १९५३ चे कलम ३ अन्वये शासनाद्वारे गठित भूदान यज्ञ मंडळाला कलम २२ अन्वये स्वत: वाही-पेरी करू शकणाऱ्या भूमिहीन शेतमजुरास भूदान जमिनीचे वाटप करण्याचे अधिकार आहेत. कलम २३ मधील तरतुदीनुसार वाटप केलेल्या शेतजमिनीची गावाच्या अधिकार अभिलेखात संबंधिताच्या नावे भूमिधारी अशी नोंद करण्यात येईल, असे कलम २४ मध्ये नमूद आहे. म्हणजेच वाटप झालेल्या जमिनी भूमिहीन शेतमजुरांच्या नावे नोंद करण्याचे कायद्याने बंधन आहे.

काय आहे भूदान चळवळ?आचार्य विनोबा भावे यांनी ७ मार्च १९५१ रोजी सेवाग्राम येथून  पदयात्रा सुरू केली. १८ एप्रिल १९५१ रोजी पदयात्रा सध्याच्या तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावी पोहोचली. याच ठिकाणी त्यांनी ‘सब भूमी गोपाल की’ अशी घोषणा करून देशातील जमीनदारांकडे भूमिहिनांसाठी जमिनी मागण्याचा प्रयोग सुरू केला. त्यासाठी विनोबाजींनी तब्बल ४० हजार मैल पदयात्रा केली. दान मिळालेली लाखो हेक्टर जमीन तत्कालीन भूदान समित्यातर्फे भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली गेली.

गावाच्या विकासासाठी भूदान जमीन द्यावी, या मताचा मी नाही. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ भूमिहीन शेतमजुरांसाठी उभारली. दानातील जमिनींचा याच माध्यमासाठी उपयोग व्हावा, असे माझे मत आहे.-एकनाथ डगवार, सचिव, भूदान यज्ञ मंडळ, यवतमाळ

टॅग्स :Vinoba Bhaveविनोबा भावे