लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : देशात कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊननंतर चार महिन्यांनी अखेर लालपरी चांदूर बाजार-अमरावती मार्गावर धावू लागली आहे. चार महिन्यांनंतर शुक्रवारी जिल्हा मुख्यालयी पहिली फेरी गेली.देशात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे २५ मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण वाहतुकीसह एसटी महामंडळाच्या बससुद्धा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी अमरावती शहर वगळता इतर तालुक्यांमध्ये एसटी बसची वाहतूक सुरू करण्यात आली होती. यात चांदूर बाजार ते अमरावती बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची वर्दळ पाहिजे त्या प्रमाणात नव्हती. त्यामुळे बससेवा सुरू असली तरीही बंद असल्यासारखे भासत होते.सर्वसामान्य प्रवाशांसाठी व विद्यार्थ्यांकरिता सोयीचे व स्वस्त सेवा देणारी म्हणून एसटी बसची ओळख आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत लग्नसराईमुळे एसटी बसमध्ये चिक्कार गर्दी राहायची. पावसाळ्यातदेखील शाळा-महाविद्यालये सुरू असताना विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहत होती. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी एसटी बसकडे पाठ फिरविल्याने ही सेवा बंद केली होती. प्रवासी व विद्यार्थ्यांमुळे नेहमी गजबाजणारे चांदूर बाजार आगार चार महिन्यांपासून स्मशानशांतता होती. आता मात्र चांदूर बाजार-अमरावती बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे हळूहळू पूर्वीचे दिवस परत येईल, अशी शक्यता नागरिकांच्या चर्चेमधून वर्तविण्यात येत आहे.
- अखेर लालपरीची चाके फिरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे २५ मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण वाहतुकीसह एसटी महामंडळाच्या बससुद्धा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी अमरावती शहर वगळता इतर तालुक्यांमध्ये एसटी बसची वाहतूक सुरू करण्यात आली होती. यात चांदूर बाजार ते अमरावती बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची वर्दळ पाहिजे त्या प्रमाणात नव्हती.
ठळक मुद्देप्रवाशांची मात्र प्रतीक्षाच : चार महिन्यांनंतर चांदूर बाजार-अमरावती पहिली फेरी