लोकमत आॅनलाईनचांदूरबाजार : गाडगेबाबांच्या धर्मशाळेमुळे आज मुंबईमध्ये हजारो लोकांना व रुग्णांना आधार मिळतो. बापूसाहेब गाडगेबाबांचे महान कार्य पुढे नेत आहेत. नागरवाडी ‘इंद्रभुवन’ होण्याची गाडगेबाबांची इच्छा त्यांच्या माध्यमातून पूर्ण होईल, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले.चांदूरबाजारातील भक्तिधाम येथे गीता जयंती कार्यक्रमात प्रफुल्लता के. ठाकरे स्मृतीप्रीत्यर्थ ज्ञानेशकन्या पुरस्कार नागरवाडीचे संचालक बापूसाहेब देशमुख यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून आ. कडू बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष मनोहर किरकटे, कार्याध्यक्ष अरविंद देशमुख, माजी पोलीस पाटील शशिमोहन देशमुख, एकनाथ ठाकूर, सचिव पंडितराव मोहोड, माजी जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, व्ही.के. खांडे, निंबाळकर महाराज, कांचन देशमुख उपस्थित होत्या.वै.डॉ. प्रभाकर अमिन स्मृती उत्तम शेतकरी पुरस्कार जयप्रकाश रावनकर, प्रहार पुरस्कृत युवा शेतकरी पुरस्कार दादाराव घायर, तर सुरेखा ठाकरे पुरस्कृत उत्तम महिला शेतकरी पुरस्कार नीता सावदे यांना प्रदान करण्यात आला. बापूसाहेब देशमुख यांनी सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना गाडगेबाबांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यावर भर दिला. कल्पना देशमुख यांच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. सुरेखा ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
गाडगेबाबांची अंतिम इच्छा बापूंच्या माध्यमातून पूर्ण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 11:12 PM
गाडगेबाबांच्या धर्मशाळेमुळे आज मुंबईमध्ये हजारो लोकांना व रुग्णांना आधार मिळतो. बापूसाहेब गाडगेबाबांचे महान कार्य पुढे नेत आहेत.
ठळक मुद्देबच्चू कडू : ‘ज्ञानेशकन्या पुरस्कार’ नागरवाडीच्या बापूसाहेबांना प्रदान