आॅनलाईन लोकमतअमरावती : माहुली धांडे येथील शेख शारीफ यांच्या हत्येचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतला आहे. गुन्हा कबूल करून सात दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप दर्यापूर पोलिसांच्या हाती विशेष काहीच लागले नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.फरजाना परविन शारीफ शहा इतर चार आरोपींनी मृत शारीफचा खून करून मृतदेह अकोट-पोपटखेड मार्गावरील फेकला होता. याची कबुली दिली आहे. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी १२ जानेवारीला गुन्हा दाखल केला व मृतदेहाचा शोध घेतला. तसेच पाचही आरोपींना रोज घटनास्थळी नेऊन संपूर्ण परिसराची छाननी केली. सात दिवसानंतरही मृतदेह सापडला नसल्याने आरोपी दिशाभूल करीत आहेत का, याचाही शोध लावणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अखेर १८ जानेवारीपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास हाती घेत चौकशीला प्रारंभ के ला आहे.आता पुन्हा नव्याने तपास सुरू झाला. एलसीबीने घटनास्थळाची पाहणी केली. शारीफचा मृतदेह शोधू न शकलेल्या दर्यापूर पोलिसांनंतर एलसीबी या प्रकरणाचा छडा लावणार का, हा कळीचा प्रश्न झाला आहे. एलसीबीने तपास हाती घेतल्यावर हे प्रकरण नव्याने हाताळले जाणार आहे. यामुळे काही नव्या गोष्टींचा छडाही लागू शकतो. यात अल्ताफच्या पत्नीचा मृत्यू, कॉल डिटेल्स, आरोपी व मृताचे इंदूरचे वास्तव्य, माहुली येथील घटनाक्रम, घटानास्थळावरील मोबाइल डेटाचा तपास, आरोपी फरजाना व अल्ताफ यांच्यातील संबंधाव्यतिरिक्त इतर संबंध याचाही तपास केला जाणार आहे.
एलसीबीचे पथक लावणार का तपास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:04 PM
माहुली धांडे येथील शेख शारीफ यांच्या हत्येचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतला आहे. गुन्हा कबूल करून सात दिवस झाले आहेत.
ठळक मुद्देशारीफ हत्याकांड : सात दिवसानंतरही मृतदेह गायबच