(कॉमन)
निबंध, चित्रकला स्पर्धा, शासकीय, अनुदानित, एकलव्य निवासी आश्रमशाळांतील विद्यार्थांचा सहभाग अमरावती : भारतीय गणितज्ञ्ज श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जंयतीनिमित्त २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणितदिनी पार पडलेल्या रा्जयस्तरीय ‘गणित माझा सोबती’ निबंध स्पर्धेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर या अपर आयुक्त कार्यालयांतर्ग़त अमरावती विभागातील चार विद्यार्थी यात झळकले आहे.
आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणात या निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कोराेना स्ंसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रायबल’ने शासकीय, अनुदानित व एकलव्य निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थांसाठी आयोजित केल्या होत्या. यात चित्रकला स्पर्धेत प्रियांका घवास (अमरावती), अभिमन्यू तुमराम (नागपूर) तर, प्रिया पवार (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळविला आहे. पंकजा थोरात (नाशिक), समृद्धी कापडे (ठाणे) व प्रतिभा गायकवाड (नाशिक) यांनी अनुक्रमे द्धितीय, तर अजित भवर (ठाणे), अस्मिता पाटकर (ठाणे), शुभांगी कासले (ठाणे) यांनी अनुक्रमे तिसरा क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिक करीना डोंगरे (ठाणे), दिव्या सस्त्या (अमरावती) यांनी मिळविले आहे.
निबंध स्पर्धेत नंदिनी मडावी (नागपूर), आशिक ढगे (अमरावती), सुहानी गावित (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक, रेश्मा मर्हळ (ठाणे), प्रीती गडग (ठाणे), वैष्णवी कुंभरे (नागपूर) अनुक्रमे द्धितीय क्रमांक, भारती गावित (नाशिक), आरती सिडाम (नागपूर), प्रियांका भोयर (नागपूर) तर, रोहित पुडो (ठाणे), तेजस्विनी बारगा ( ठाणे), सरिता बेलसरे यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकाविले, अशी माहिती अमरावतीचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी दिली.