लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्याची जपणूक व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक रानवैभवाला नावीन्यपूर्ण योजनेतून येत्या काळात हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे केले.कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित रानभाज्या महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य शशांक देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयंत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.७० प्रकारच्या रानभाज्यांचे 'स्टॉल'शुक्रवारी पार पडलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शनी व महोत्सवात एकूण ७० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले. शहरी नागरिकांना अप्रुप वाटेल अशा रानभाज्यांनी लक्ष वेधले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा रानभाज्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली. हा अमूल्य ठेवा आदिवासींनी जोपासल्याबाबत त्यांनी कौतुक केले. कृषी विभागाने पुस्तिकेच्या माध्यमातून रानभाज्यांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
रानभाज्यांना स्वतंत्र बाजारपेठ मिळणार : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 5:00 AM
शुक्रवारी पार पडलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शनी व महोत्सवात एकूण ७० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले. शहरी नागरिकांना अप्रुप वाटेल अशा रानभाज्यांनी लक्ष वेधले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा रानभाज्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली. हा अमूल्य ठेवा आदिवासींनी जोपासल्याबाबत त्यांनी कौतुक केले. कृषी विभागाने पुस्तिकेच्या माध्यमातून रानभाज्यांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
ठळक मुद्देप्रदर्शनीत ७० भाज्या : शिवाजी उद्यान महाविद्यालयात रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन