शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

विद्यापीठात पुन्हा बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 10:18 PM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याचा संचार कायम आहे. आवडते भक्ष्य कुत्रे आणि तहान भागविण्यासाठी पाणी येथे उपलब्ध आहे. तलाव परिसरात जाणाऱ्या मार्गातील नाल्यातून बिबट्याची ये-जा सुरू असल्याचे सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्ष बघितले आहे.

ठळक मुद्देसुरक्षा रक्षकांनी बघितले : अचानक रोडावली कुत्र्यांची संख्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याचा संचार कायम आहे. आवडते भक्ष्य कुत्रे आणि तहान भागविण्यासाठी पाणी येथे उपलब्ध आहे. तलाव परिसरात जाणाऱ्या मार्गातील नाल्यातून बिबट्याची ये-जा सुरू असल्याचे सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्ष बघितले आहे.विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या तलाव परिसरात बिबट्याने गाय फस्त केल्याची घटना २८ डिसेंबर २०१८ रोजी निदर्शनास आली होती. तेव्हापासून विद्यापीठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे वारंवार पुढे येत आहे. मध्यतंरी बिबट्याने मुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, गेस्ट हाऊस या भागापर्यंत मजल गाठली होती. त्याचा वावर येथे वास्तव्यास असलेल्या मनुष्यांंसाठी धोकादायक होता.दरम्यान, सुरक्षा रक्षकाला बिबट रस्ता ओलांडताना दिसून आला. त्यामुळे विद्यापीठात पहाटे भ्रमंतीस येणाऱ्यांना जंगल आणि तलाव परिसरासह अन्य काही भागात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली. त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने सतर्कतेच्या दृष्टीने जागोजागी धोक्याचा इशारा देणारे पोस्टरदेखील लावले. जानेवारी ते फेब्रुवारी असे दोन महिने बिबट्याचा मुक्त संचार ट्रॅप कॅमेºयात कैद झाला नाही. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बिबट नाल्यावाटे मुलींच्या वसतिगृह परिसरातून येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी बघितले आहे.उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. या दिवसांत बिबट दिवसा झाडाझुडपात थंड ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचा अंदाज आहे. पाणी व शिकार अशा दोन्ही बाबी एकाच वेळी उपलब्ध होत असल्यामुळे बिबट्याने विद्यापीठ परिसरातच ठिय्या मांडला आहे.जीवशास्त्र विभाग इमारतीच्या मागील बाजूस वास्तव्यजीवशास्त्र विभाग इमारतींच्या मागील बाजूस झाडाझुडपात सध्या एका बिबट्याचा संचार आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी बिबट दिसून आला. येथील शेततळ्यावर मुबलक पाणी असून, तो कुत्र्यांची सहजतेने शिकार करीत असल्याची माहिती उपकुलसचिव (सुरक्षा) रवींद्र सयाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भटकी कुत्री गेली कुठे?विद्यापीठात कॅन्टीन, मुलामुलींचे वसतिगृह, कुलगुरू बंगला, गेस्ट हाऊस, मेस परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय होती. मात्र, काही दिवसांपासून भटक्या कु त्र्यांची संख्या अचानक रोडावली. बिबट कुत्र्यांची शिकार करतो. त्यामुळे कुत्र्यांची रोडावलेली संख्या बिबट्याच्या वास्तव्याला दुजोरा देत आहे.विद्यापीठात बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांचे दैनंदिन निरीक्षण केले जात होते. मात्र, बिबट कैद झाला नसल्याने त्याने जंगलात प्रवेश केला असावा, असा अंदाज बांधला गेला. परिणामी ट्रॅप कॅमेरे काढण्यात आले. परंतु, बिबट विद्यापीठ परिसरात आला असेल, तर पुन्हा कॅमेरे बसविले जातील.- कैलास भुंबरवनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी