शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

कोंडेश्वर परिसरात बिबट्याचा वावर

By admin | Published: November 28, 2015 1:03 AM

कोंडेश्वरच्या आसपासचे जंगल आणि गोविंदपूर या अवघ्या ३०० लोकवस्तीच्या गावातील ग्रामस्थांना दोन महिन्यात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे.

गोविंदपूरवासी भयभीत : गावकरी सांगतात पट्टेदार वाघाचेही अस्तित्वश्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराकोंडेश्वरच्या आसपासचे जंगल आणि गोविंदपूर या अवघ्या ३०० लोकवस्तीच्या गावातील ग्रामस्थांना दोन महिन्यात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. मात्र, आपल्याला या भागात पट्टेदार वाघही दिसल्याचे गावकरी सांगतात. यामुळे गावकरी सद्यस्थितीत दहशतीच्या छायेत वावरत आहेत. हा पाणवठ्याच्या आणि जंगल परिसर असल्याने येथील ग्रामस्थांची दिनचर्याच प्रभावित झाली आहे. श्रीक्षेत्र कोंडेश्वरपासून अगदी हाकेच्या अंतरावर गोविंदपूर गाव आहे. या गावालगत ‘बंदरजीरा’ हे वनक्षेत्र आहे. मागच्या दीड महिन्यांपासून गोविंदपूर गावालगतच्या जंगल परिसरात बिबट व पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असल्याचे गावकरी सांगतात. अनेक गावकऱ्यांना बिबटच नव्हे तर पट्टेदार वाघही आढळल्याचे ते सांगतात. बिबटाने परिसरातील काही जनावरे फस्त केल्याचे भयभीत गावकरी सांगतात. गोविंदपूर गावाला लागूनच डोंगराळ भाग आहे. गावासमोरुन जाणाऱ्या रस्त्यालगत बिबट अनेकदा आढळून आला. गोविंदपूर गावातील बहुतांश ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. रात्रीच्या वेळी अनेकदा बिबट किंवा पट्टेदार वाघांच्या डरकाळ्या ऐकल्याचे गोविंदपूरवासी छातीठोकपणे सांगतात. पाण्यासाठी कोंडेश्वर तलावावर येतो बिबटश्रीक्षेत्र कोंडेश्वर परिसरात गैबीपीर, भीवापूर, अलियाबाद असे तीन तलाव आहे. या तलावांच्या भोवताल जंगल परिसर आहे. रात्रीच्या वेळी या तलावांवर बिबट किंवा पट्टेदार वाघ पाणी पिण्यासाठी येतो. कोंडेश्वर परिसरात वाघाची डरकाळी अनेकांनी ऐकली आहे. दिवसा मात्र अद्याप या भागात बिबट आढळून आला नाही.