चांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी जंगलात चांदूर रेल्वे-अमरावती मार्गावरील सावंगा विठोबा फाट्याजवळ पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे दर्शन झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिबट्याबाबत स्थानिक वनविभागाकडून शुक्रवारी दुजोरासुद्धा मिळाला.
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारे चिरोडी, पोहरा जंगल समृद्ध असून या जंगलात तृणभक्षी प्राणी मुबलक आहेत. बिबट्यासाठी सदर जंगल हे पोषक आहे. अशातच चांदूर रेल्वे-अमरावती मार्गावर सावंगा विठोबा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एका बिबट्याचे दर्शन झाले. त्याला एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्याने टिपले. सदर व्हिडियो हा सोशल मीडियावर व्हायरल झसा आहे. या जंगलामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे पिकांना इतर वन्यप्राण्यांचा त्रास कमी आहे. तथापि, नागरिकांनी भीती न बाळगता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
140821\img-20210814-wa0031.jpg
photo