फोटो - हरण १४ पी
मंगरूळ दस्तगीर : येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूड बगाजी मार्गालगत आशिष हांडे यांच्या शेतात बिबट्याने हरणाची शिकार केल्याचे निदर्शनास आले आहे.
गत पंधरा दिवसांपासून गोकुळसरा, सोनोरा काकडे, दिघी महल्ले या भागात बिबट्याचा वावर आहे. शुक्रवारी रात्री वरूड बगाजी या भागातील एका शेतकऱ्याच्या शेताजवळ या बिबट्याने हरणाची शिकार केली. शनिवारी सकाळी काही शेतकरी शेतात गेले असता मृत हरीण त्यांना निदर्शनास आले. यादरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनात महिला वनरक्षक भुजाडे यांनी या भागात जाऊन पाहणी केली असता बिबट्याचे पगमार्क मृत हरणाच्या बाजूला आढळले. परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. रात्रीच्या वेळेत शेतात जाऊ नये, असे आवाहन वरूड बगाजी येथील सरपंच स्नेहा लुटे, उपसरपंच गणेश धोटे यांनी केले आहे.