शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

अंजनगावात भोंग्याचा गोंगाट कमी; जिल्ह्यात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2022 5:00 AM

बुधवारी सायंकाळी ७ वाजता काही मनसे कार्यकर्ते हनुमान चौकातील मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच ठाणेदार सुनील किनगे यांनी मौलवींसोबत झालेल्या निर्णयाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली. यानंतर हनुमान मंदिरात चालिसा पठण झाले नाही. केवळ सायंकाळची दैनंदिन आरती पार पडली. 

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार/वनोजा बाग : भोंग्यामुळे राज्यस्तरावर उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी शहरातील मशिदींमध्ये गुरुवारी सकाळी लाऊड स्पीकरवरून अजान बंद करून नमाज अदा करण्यात आली. चांदूर बाजारसह जिल्हाभरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर हाच कित्ता गिरवित सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून दिला.अंजनगावात बुधवारी सायंकाळी यासंबंधी झालेल्या सभेत पोलिसांनी शांततेचे आवाहन करीत न्यायालयाच्या निर्देशांबाबत माहिती दिली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे व अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. याप्रसंगी काजी अब्दुल कलीम, नजीर अहमद, मौलवी शेख हुसैन, काजी अब्दुल शकील, मोहम्मद मोहसिन, पप्पू भाई, आरिफ टेलर, अजहरुद्दीन, अब्दुल लतीफ आदी उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी गुरुवारी सकाळी  ५ ची अजान बंद केली. दुपारीदेखील कमी आवाजात लाऊड स्पीकरवर अजान घेतली. दोन्ही समुदायाच्या संयत भूमिकेमुळे प्रक्षोभक घटनेची नोंद झाली नाही. चांदूर बाजार शहरात गुरुवारी सकाळी ६ ची नमाज भोंग्याविना झाली. शहरातील मशिदींच्या मौलवींसोबत ठाणेदार सुनील किनगे यांनी बुधवारी सायंकाळी बैठक घेतली.

हनुमान चालिसाचे पठण झालेच नाही बुधवारी सायंकाळी ७ वाजता काही मनसे कार्यकर्ते हनुमान चौकातील मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच ठाणेदार सुनील किनगे यांनी मौलवींसोबत झालेल्या निर्णयाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना दिली. यानंतर हनुमान मंदिरात चालिसा पठण झाले नाही. केवळ सायंकाळची दैनंदिन आरती पार पडली. 

जुळ्या शहरात पहाटेची नमाज शांततेत परतवाडा : अचलपूर, परतवाडा या जुळ्या शहरांसह चिखलदरा तालुक्यात  गुरुवारी सकाळची नमाज भोंगा न वाजता झाली, असा पोलिसांचा अहवाल आहे. अचलपूर, परतवाडा व सरमसपुरा ठाण्याच्या हद्दीत ७१, तर चिखलदऱ्यात तीन मशिदी आहेत. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मशिदींच्या मौलवींची समन्वय बैठक घेण्यात आली. यात न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंग्याविना नमाज अदा करण्याचा निर्णय पुढे आला. नागरिकांचा सुयोग्य प्रतिसाद आहे. - सुनील किनगे, ठाणेदार, चांदूर बाजार

 

टॅग्स :Policeपोलिस