आॅनलाईन लोकमतचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्याला यंदा पर्यटकांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे वास्तव समोर आले आहे. मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी ३०० वाहनांसह दुचाकी मिळून नगरपालिकेला केवळ २५ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.मावळत्या वर्षापेक्षा सोमवार, १ जानेवारी या नववर्षात तीन हजारांवर पर्यटकांनी लावलेली हजेरी लावली. चिखलदरा येथे नववर्षांचे स्वागत करण्यासह मौज मस्ती करण्यासाठी येणारे पर्यटक दिवसभर बहिरम यात्रेत फिरल्यानंतर सायंकाळी चिखलदरा जाण्याच्या बेतात असताना, ठिकठिकाणी पोलिसांची तपासणी पाहून माघारी परतले. धामणगाव गढी येथील वनविभागाच्या नाक्यावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी होत होती. नगरपालिकेच्या पर्यटक कर वसुली नाक्यावर ३० आणि ३१ डिसेंबर या दोन दिवसात जवळपास सातशे वाहनांची नोंद झाली.केव्हा होणार पॉर्इंटवरील रस्ते ?विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळावर पॉइंटच्या रस्त्याची चाळण झाली आहे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. पंचबोल आणि भीमकुंड या दोन्ही पॉइंंटवर जाण्यापूर्वीच पर्यटक निराशेने परतत आहेत. राज्य शासनाने लक्ष देण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.प्यायला पाणी अन् बोलायला नेटवर्क नाही ?‘सर्व सुविधायुक्त असलेले निसर्गरम्य ठिकाण’ अशी संकल्पना घेऊन येणाऱ्या पर्यटकांची येथे आल्यावर निराशा होत असल्याचे वास्तव आहे. हजारो रुपये खर्चून आल्यावर मुबलक पाणीही मिळत नाही. बेपत्ता मोबाइल नेटवर्कचा सामना पर्यटकासह स्थानिकांना करावा लागत आहे. परिणामी प्रसन्न मनाने येणारे पर्यटक निराश होत आहेत.
पर्यटकांची चिखलदऱ्याकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 10:51 PM
विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्याला यंदा पर्यटकांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे वास्तव समोर आले आहे.
ठळक मुद्देसंख्या रोडावली : विदर्भाच्या नंदनवनात मावळत्या वर्षाला थंड प्रतिसाद