मुनगंटीवार : शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लावण्याच्या इच्छेने बिजारोपण करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण विभागाने ही गरज ओळखत त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्राथमिक शिक्षणादरम्यान आपल्याला जिवन कसे जगावे याचे धडे दिले जातात. त्याचप्रमाणे वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व संरक्षणाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करावी, असे आवाहन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गुरूवारी त्यांनी नागपुरातील वरिष्ठ वनाधिकारी व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी पर्यावरण विषयक शिक्षण तापमान वाढ, हवामान बदल याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. ग्रीन आर्मी, हॅलो फॉरेस्ट या वन विभागाच्या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे धडे
By admin | Published: June 10, 2017 12:11 AM