लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवतेची महान मूल्ये संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिली आहेत. संविधानाच्या या चौकटीला धक्का लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार सर्वांनी करूया, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केले.महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ना. ठाकूर यांनी अभिवादन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने मानवतेच्या महान मूल्यांची देणगी प्रत्येक भारतीयाला दिली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, एकता व एकात्मता या संविधानातील मूल्यांची जपणूक करणे व संविधानाची चौकट अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसा निश्चय व निर्धार नागरिक म्हणून आपण सर्वांनी करूया, असे आवाहन त्यांनी समस्त जनतेला केले. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर, बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहीकर, दिलीप एडतकर, नाना नागमोते, उमेश घुरडे, रामभाऊ पाटील, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, रामेश्वर अभ्यंकर, मिलिंद तायडे, प्रफुल्ल गवई, राजकुमार मून, कमल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार करूया : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 5:00 AM
ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने मानवतेच्या महान मूल्यांची देणगी प्रत्येक भारतीयाला दिली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, एकता व एकात्मता या संविधानातील मूल्यांची जपणूक करणे व संविधानाची चौकट अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसा निश्चय व निर्धार नागरिक म्हणून आपण सर्वांनी करूया, असे आवाहन त्यांनी समस्त जनतेला केले.
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन