काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी महाआघाडी की एकला चलो रे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:01:01+5:30

जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय ताकद बळकट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नेमका काय अहवाल पाठवितात, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांच्या रूपाने जिल्ह्याचे नेतृत्वदेखील काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची भूमिका त्याबाबत निर्णायक राहणार आहे. काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी सुरू केल्याने महाआघाडी की एकला चलो रे, याबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उत्सुकता टांगणीला लागली आहे.

Let's go alone to test the Congress for self-reliance? | काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी महाआघाडी की एकला चलो रे ?

काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी महाआघाडी की एकला चलो रे ?

Next

प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यभरातील प्रमुख राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी चालविली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्षांकडून त्या स्वबळावर लढण्याबाबत अहवाल मागविले आहेत.  काँग्रेसने स्वबळाची चाचपणी सुरू केल्याने राजकीय गोटात वातावरण तापले आहे. 
जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय ताकद बळकट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नेमका काय अहवाल पाठवितात, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांच्या रूपाने जिल्ह्याचे नेतृत्वदेखील काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची भूमिका त्याबाबत निर्णायक राहणार आहे. 
काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी सुरू केल्याने महाआघाडी की एकला चलो रे, याबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उत्सुकता टांगणीला लागली आहे.

तीन आमदार काँग्रेसचे
- जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी तीन काँग्रेसच्या ताब्यात आहेत.
- अमरावतीची आमदारकी सुलभा खोडकेंकडे, दर्यापूरची आमदारकी बळवंत वानखडे यांच्याकडे, तर तिवस्याचे प्रतिनिधित्व पालकमंत्री यशोमती ठाकूर या करीत आहेत.

जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता
१) ५९ सदस्यीय अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २६ सदस्य आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. 
२) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे. त्यांची जिल्हा परिषदेच्या राजकारणावर पकड आहे.

सर्व निवडणुका स्वबळावर लढू...

जिल्ह्यात काँग्रेस सशक्त आणि बळकट आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकादेखील आम्ही स्वबळावर लढलो. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकादेखील कुणाशीही युती, आघाडी न करता स्वबळावर लढू. 
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

लवकरच निवडणुका
- जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामागोमाग महापालिका व जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. 
- महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळीदेखील सुरू झाली आहे. तेथे अनेक वर्षांनंतर काँग्रेस पक्ष विरोधी बाकावर आहे.

लोकसभेत उमेदवारच नाही
- १९९१ नंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारच दिला नाही. रिपाइंचे रा.सू. गवई, त्यांचे पुत्र राजेंद्र गवई व अलीकडच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. 
- पाठिंबा दिलेल्या उमेदवारानेच  ‘हात’ दाखविल्याने २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार   उतरविण्याची शक्यता आहे.

पंचायत समित्यांमध्ये एक नंबर
जिल्ह्यात १४ पंचायत समित्या आहेत. एकूण ११८ गण आहेत. अर्ध्याअधिक पंचायत समित्यांचे सभापतिपद काँग्रेसच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणी हे पद मित्रपक्षाकडे असले तरी उपसभापतिपद काँग्रेसकडे आहे. 

 

Web Title: Let's go alone to test the Congress for self-reliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.