अमरावती : दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. हा काळ मोठे आव्हान देणारा ठरला. या काळात विशेषत: रक्तदान शिबिरे नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रति आपणही काही देणं लागतो, या उदात्त भावनेने स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहाने २ ते ११ जुलै दरम्यान राज्यात आयोजित केलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोेहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊया, असे आवाहन खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, राज्य राखीव दलाचे समादेशक हर्ष पोदार यांनी केले आहे. शिवाय उपक्रमाकरिता ‘लोकमत’ समूहाचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. खासदार नवनीत राणा म्हणाल्या, लोकमतच्या उपक्रम स्तुत्य आहे. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भरून काढता येईल. आमदार सुलभा खोडके यांनी कोरोना काळात आरोग्य यंत्रणेला हातभार लावणारा उपक्रम हाती घेतल्याने ‘लाेकमत’चे अभिनंदन केले. या उपक्रमाचा समाजाला नक्कीच फायदा होईल. राज्य राखीव दलाचे समादेशक हर्ष पोदार यांनी कोरोना काळात प्रत्येकाला रक्तदान करून समाजाचे ऋण फेडण्याची ही संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
चला ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सामील होऊया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:11 AM