लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : भारतीय वन्यजीव कायद्याच्या शेड्यूल-४ अंतर्गत येत असलेल्या पांढºया मानेचा करकोचा पक्ष्याला प्रशासनाकडून जीवनदान मिळाले आहे. पक्षी आणि त्याची अंडी वाचविण्याकरिता चक्क ते झाड न तोडण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे, तर ते झाड तोडण्याची परवानगी देणाऱ्या वनविभागानेही आपली परवानगी मागे घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार, चांदूर बाजार शहरातून वलगावपर्यंत जाणाऱ्या मार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करण्याकरिता रस्त्यालगतची झाडे, जी विकासकामाच्या आड येत आहेत, ती परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.दरम्यान, त्यातील एका कडुनिंबाच्या झाडावर अगदी शेंड्यावर पांढºया मानेच्या करकोचा पक्ष्याचे घरटे आहे. तो पक्षी व त्याची अंडी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा काळे यांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे, कनिष्ठ अभियंता ललित बोबडे, परतवाडा वनपरिक्षेत्राचे वनपाल डी.सी. लोखंडे, चांदूर बाजार तहसीलदार जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली.त्या पक्ष्याचे घरटे, पक्षी आणि त्याची अंडी याची खात्री करून घेण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याने त्याचे निरीक्षण केले गेले.ड्रोन कॅमेऱ्याने निरीक्षण सुरू असताना त्या पक्ष्याने आपली अंडी वाचविण्याकरिता त्याने ती अंडी आपल्या पंखाखाली घेतली आणि अखेर ते सर्व बघून प्रशासन त्या पक्षाच्या बाजूने उभे राहिले. पक्षी आणि पक्ष्याची ती अंडी वाचविण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाबाबत जिल्हाभरातील पक्षिप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.पिले मोठी होर्ईपर्यंत रोखणार वृक्षतोडझाडावरील पांढऱ्या मानेचा करकोचा पक्षी आणि ती अंडी यांचे पालकत्व उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारले. अंड्यातून त्या पक्षाची पिलं बाहेर आल्यानंतर ती पिलं मोठी होऊन उडून जात नाहीत, तोपर्यंत झाड न तोडण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. पक्षी आणि त्या पक्षाची अंडी वाचविण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारलेली भूमिका, तहसीलदार जगताप व वनपाल डी.सी. लोखंडे यांनी केलेले सहकार्य आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे शिवा काळे यांच्या प्रयत्नांचे पक्षिमित्रांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.पांढºया मानेचा करकोचा पक्षी सर्वसाधारपणे आढळून येत नाही. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पूर्ण वाढ झालेला करकोचा पक्षी उंचीला अडीच ते तीन फुटांपर्यंत असतो. आपल्या कमरेपर्यंत तो येतो. त्याला वाचविणे हे प्रथम कर्तव्य असावे.- विशाल बनसोड, मानद वन्यजीवरक्षक, अमरावतीझाडावरील पांढऱ्या मानेचा करकोचा पक्षी आणि त्याने दिलेल्या अंड्यातील पिलं बाहेर पडून उडण्यास सक्षम होत नाहीत, तोपर्यंत ते झाड तोडले जाणार नाही.- मिलिंद भेंडे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चांदूर बाजारशेड्यूल-४ मधील पक्षी व त्यांची अंडी वाचावीत, याकरीता ते झाड न कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा.
पांढऱ्या मानेच्या करकोचाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 5:00 AM
त्या पक्ष्याचे घरटे, पक्षी आणि त्याची अंडी याची खात्री करून घेण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याने त्याचे निरीक्षण केले गेले. ड्रोन कॅमेऱ्याने निरीक्षण सुरू असताना त्या पक्ष्याने आपली अंडी वाचविण्याकरिता त्याने ती अंडी आपल्या पंखाखाली घेतली आणि अखेर ते सर्व बघून प्रशासन त्या पक्षाच्या बाजूने उभे राहिले. पक्षी आणि पक्ष्याची ती अंडी वाचविण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाबाबत जिल्हाभरातील पक्षिप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देझाडे तोडण्याचा निर्णय थांबविला : सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारले पालकत्व