शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

पत्नीची हत्या करणाऱ्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:44 AM

पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश शामराव युवनाते (३६,रा.जामगाव) असे, गुन्हेगाराचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय (५) चे न्यायाधीश निखील मेहता यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देन्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : जामगावचे २०१७ मधील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश शामराव युवनाते (३६,रा.जामगाव) असे, गुन्हेगाराचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय (५) चे न्यायाधीश निखील मेहता यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला.विधी सूत्रानुसार, नरेश युवनाते याने राधा यांच्याशी प्रेमविवाह केला. त्यांना एक मुलगी व एक मुलगा, अशी दोन अपत्ये झाली. मात्र, पती नरेश दारू पिऊन पत्नी राधाला मारहाण करीत होता. १० मार्च २०१७ रोजी राधा यांनी पती नरेशविरुद्ध शेंदूजनाघाट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यानच्या काळात युवनाते दाम्पत्यांची दोन्ही मुले मोठ्या वडिलांकडे राहायला गेले. १० एप्रिल २०१७ रोजी राधा ही तिच्या गावातील बहीण राघू सुनील कसलीकर यांच्याकडे गेली. त्यांनी बहिणीला पतीच्या मारहाणीबद्दल सांगितले. दरम्यान, नरेश तेथे पोहोचला. त्याने बँकेतून पैसे आणण्याचे कारण सांगून राधाला सोबत घेऊन गेला. ११ एप्रिल २०१७ रोजी दुपारी राधा यांचा मुलगा मावशी राघू कसलीकर यांच्याकडे गेला. मावशीने आईबद्दल त्याला विचारले. बाबांनी आईला मारहाण केल्यामुळे ती झोपली आहे, असे त्याने मावशीला सांगितले. त्यामुळे राघू बहीण राधाला पाहण्यासाठी तिच्या घरी पोहोचली. तिचे घर बंद दिसले. घरासमोर रक्त सांडलेले दिसले. त्यामुळे राघू यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी राधा यांच्या अंगावर पांघरूण होते. त्यांनी पांघरूण काढून पाहिले असता, त्यांना राधा मृतावस्थेत आढळली. राघू कसलीकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती नरेश युवनातेविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला. पोलीस अधिकारी शेषराव नितनवरे यांनी आरोपीला अटक केली. आरोपीने पत्नीला काठीने मारहाण करून जीवे ठार केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी अभियोक्ता दीपक आंबलकर यांनी दहा साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपीचा दोष सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपी नरेश युवनातेला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

टॅग्स :Courtन्यायालय