लोकमत विशेष
फोटो पी १५ पांढरा पूल
परतवाडा : परतवाडा ते बैतुल या आंतरराज्य महामार्गावरील पांढरा पुलावर खड्डे पडले आहेत. एक महिन्यापासून त्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती बळावली आहे. अचलपूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनमुळे येथे जीवितहानी होण्याची
शक्यतादेखील वर्तविली जात आहे. बैतूल ते अकोट आंतरराज्य मार्गाचे परतवाडा शहरातूनसुद्धा सिमेंट काँक्रीटीकरण व चौपदरीकरण करण्यात आले. चिखलदरा स्टॉपवर पांढरा पूल आहे. पूल निर्मितीच्या कामास कंत्राटदार असलेल्या संबंधित बांधकाम कंपनीला सुरुवात करायची होती. परंतु, अचलपूर नगरपालिकेने जुळ्या शहरांसाठी चंद्रभागा प्रकल्पावरून टाकलेली पाईप वाईन थेट पुलावरून आली आहे. परिणामी पूल निर्मितीचे काम थंड बस्त्यात पडले आहे. आता दुसरीकडून पाईप लाईन टाकली असली तरी त्यातून पुरवठा सुरू झाला नाही. अडथळा ठरलेली ही पुलावरील पाईप लाईन अजूनही अचलपूर नगरपालिकेच्यावतीने काढण्यात आलेली नाही.
बॉक्स
जड वाहतूक, डंपर सुसाट
मध्यप्रदेशातून बैतुल, भैंसदेही मार्गे येणारा हा मार्ग आंतरराज्यीय आहे. अमरावती, अकोला, धारणी, इंदूरसाठी याच मार्गावरून वाहनधारकांना जावे लागते. मध्यप्रदेशातील रेतीचे डंपर सुसाट वेगाने याच मार्गावरून धावततात. रात्रंदिवस जड वाहतूक होते. पांढऱ्या पुलावर डांबरीकरण करण्यात आले होते. त्यावरसुद्धा आता खड्डे पडल्याने पादचाऱ्यांसह दुचाकी, ऑटोरिक्षा व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे
बॉक्स
सर्वाधिक वाहतूक, पाईप लाईन जोडणे बाकी
परतवाडा शहरात जाणारा मार्ग आल्याने पांढरा पुलावरून सर्वाधिक वाहतूक आहे चंद्रभागा प्रकल्पावरून जुळ्या शहरांसाठी पाणीपुरवठ्याची पाईप लाईन खालून टाकन्यात आली असली तरी तिची जोडणी बाकी आहे. दुसरीकडे पुलावरील पाईपलाईन अजूनही काढण्यात आली नाही. त्यामुळे पुलावरून पाणी काढण्यासाठी जागा नसल्याने डांबरीकरण व इतरही खड्डे बुजवण्यासाठी संबंधित राष्ट्रीय प्राधिकरण विभागाला पर्याय उरला नसल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
मुख्याधिकारी घेत आहे माहिती
अपघातामुळे साडेतीन महिन्यांपासून आजारी असलेले अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले रुजू झाले असले तरी पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत. पांढरा पुलावरील पाईप लाईन काढून अडथळा दूर करण्यासाठी संबंधित विभाग व कंत्राटदार अशी बोलून अडचण दूर केली जाणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोट
पुलाखालून थेट मुगले येथील पाणी टाकीपर्यंत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्याची जोडणी बाकी असून, संबंधित विभाग व अभियंत्यांशी बोलून अडथळा दूर करण्यात येईल.
- राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, अचलपूर
कोट
नगरपालिकेला पाईप लाईन काढण्याचे पत्र दिले. पुलावर डांबरीकरण केले. परंतु उतार भाग असल्याने तेथे पाणी काढण्यासाठी जागा नाही. पाईप लाईन निघताच तशी व्यवस्था करून मार्ग सुरळीत करण्यात येईल. तूर्तास पुन्हा खड्डे बुजविण्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे.
- पी.एस. वासनकर, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग
ता पुलावरून टाकण्यात आली आहे त्यामुळे ही पाईपलाईन काढल्यानंतरच संबंधीत नवीन पुलाचे बांधकाम होणार आहे त्यासाठी पालिका आता पुन्हा नव्याने खर्च करणार आहे
===Photopath===
150621\img-20210614-wa0109.jpg
===Caption===
पांढऱ्या पुलावर जीव खड्डे परतवाडा