अपघात वाढले : नियमांची सर्रास होतेय पायमल्लीअमरावती : वाहतूक नियम धाब्यावर ठेवल्याने अमरावती शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावतीकरांना जीव टागंणीवर ठेवूनच वाहन चालवावे लागत आहे. ही भयावह जीवघेणी वाहतूक दररोज शहराच्या प्रतिष्ठेला गालबोट लावत आहे. अनियंत्रित व बेभान वाहनचालकांवर नियंत्रण नसल्याने जनसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील ११ महिन्यांत शहरात २४७ अपघात घडले असून त्यामध्ये सुमारे १२५ नागरिकांना प्राणाला मुकावे लागले आहे. शहरात ५० हजारांच्यावर वाहनांची संख्या पोहोचली आहे. त्यातच बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढल्याने शहरातील मार्गावर चालणेही कठीण झाले आहे. दररोज शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहनांची मोठी वर्दळ वाढत असल्यामुळे वाहतूक नियंत्रणाचाही पार बोजबारा उडाला आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस तैनात असतानाही विस्कळीत वाहतुकीमुळे अपघात घडत आहेत. शहरातील मुख्य चौक राजकमल, जयस्तंभ, इर्विन चौक, मालविय चौक, गांधी चौक, राजापेठ चौक अशा प्रत्येक चौकात वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा उडाल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांसाठीच बनली शासकीय पार्किंगशहरातील मुख्य बाजारपेठत नागरिकांची गर्दी वाढली आहे. बहुंताश नागरिक वस्तू खरेदीकरिता वाहन घेऊनच बाजारपेठत जातात. मात्र पार्किगची जागा अपुरी पडत असल्यामुळे प्रत्येक जण व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांसमोर आपले वाहन उभी करतात. ज्या प्रतिष्ठानात नागरिकांना खरेदीकरिता जायचे आहेत, त्याच प्रतिष्ठासमोर वाहन लावण्यास व्यापारी वर्ग वाहने उभी करण्यासाठी परवानगी देतात. अन्यथा दुसऱ्या प्रतिष्ठानात जाणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्या मनाई केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक मार्गावरच वाहने ठेऊन खरेदीसाठी जाताना आढळून येतात. त्यामुळे दरदिवसाला वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळते.
जीवघेणी वाहतूक!
By admin | Published: November 30, 2014 10:55 PM