शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

कमलतार्इंना जीवनगौरव; ८ कर्तबगार सखींना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:47 PM

लोकमत सखी मंचच्यावतीने दिला जाणारा सखी सन्मान जीवन गौरव पुरस्कार स्वप्रकाशाने अनंतदीप प्रज्वलित करणाऱ्या कमलताई गवई यांना बहाल करण्यात आला.

ठळक मुद्देसेवाव्रतींच्या कार्याला वंदन : लोकमत सखी मंच व आराधना आयोजित सखी सन्मान सोहळा

आॅनलाईन लोकमतअमरावती : लोकमत सखी मंचच्यावतीने दिला जाणारा सखी सन्मान जीवन गौरव पुरस्कार स्वप्रकाशाने अनंतदीप प्रज्वलित करणाऱ्या कमलताई गवई यांना बहाल करण्यात आला. विविध आठ क्षेत्रात कर्तबगारी गाजविणाऱ्या महिलांनाही पुरस्कृत करण्यात आले. पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये कांचनमाला गावंडे (शैक्षणिक), पोलीस उपनिरीक्षक ज्योती बळेगावे (शौर्य), गुंजन गोळे (सामाजिक), मंगला चांदूरकर (औद्योगिक), विद्या तायडे (आरोग्य), तेजस्विनी दहीकर (क्रीडा) आणि माधुरी सुधा (सांस्कृतिक व साहित्यिक) यांचा समावेश आहे. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. हा पुरस्कार सोहळा ‘लोकमत सखीमंच व आराधना’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.येथील हॉटेल महफिल इनच्या लॉनवर शुक्रवारी आयोजित शानदार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तत्कालीन अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, सुप्रसिद्ध साहित्यिक प्रभा गणोरकर, आमदार यशोमती ठाकूर, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. अतुल यादगिरे, प्रसिद्ध मुर्तिकार अतूल जिराफे, आराधना फॅशनचे संचालक पूरण हबलानी, लोकमतचे संपादकीय प्रमुख गणेश देशमुख उपस्थित होते.श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. तुळशीचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गणेश देशमुख यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. संचालन नीलिमा काळे, तर आभार प्रदर्शन जयंत कौलगिकर यांनी केले.आता पुढील आयुष्य गोरगरिबांसाठी -कमलताई गवईदादासाहेब गवर्इंच्या अर्धांगिनी म्हणून सामाजिक, राजकीय प्रवास करताना आलेले अनेक अनुभव कथन करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. लग्नानंतरच्या आठवणी सांगताना शिवणकाम ते नोकरी या प्रवासाची त्यांनी यशोगाथा मांडली. मात्र, सखी मंचच्या पुरस्काराने आता अधिक जबाबदारी वाढल्याचे सांगून त्यांनी पुढील आयुष्य गोर-गरिबांच्या सेवेत वाहून घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. जीवन गौरव पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.स्त्री-पुरुष भेदाभेद मुळापासून दूर व्हावा -यशोमती ठाकूरसंविधानाने समान दर्जा बहाल केला आहे. तथापि, महिलांना कमी गणल्या जाते. आज महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. तरीदेखील घरात मुलींना दुय्यम वागणूक मिळते. त्यामुळे आज स्त्री-पुरूष भेदाभेद मुळापासून संपविण्याची गरज आहे. ‘लोकमत’ सखी मंचने सेवाव्रती महिलांना गौरविल्याने त्यांना अधिक बळ मिळेल. महिलांनी आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, हे न्यूनगंड मनातून दूर करावे, असे मनोगतातून त्यांनी यावेळी व्यक्त केले.महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ -वसंत आबाजी डहाके‘लोकमत’ सखी मंचने स्त्रीयांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. गतवर्षी पुरस्कार सोहळ्याचे साक्षीदार होतो. यंदाही तो बहुमान मिळाला आहे. पुरस्कारातून महिलांना अधिक ऊर्जा मिळते. कर्तृत्ववान महिलांना बळ आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यात ‘लोकमत’ आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. येणारा काळ महिलांचा असेल, असेही ते म्हणाले.कर्करोगावर वेळीच वैद्यकीय उपचार करा -डॉ. यादगिरेस्त्रीयांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढीस लागले असून ते धोकादायक आहे. कर्करोगावर वेळीच उपचार न केल्यामुळे अनेक महिलांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार घेऊन कर्करोगावर मात करा, हे महत्त्वाचे सूत्र त्यांनी महिलांना मार्गदर्शनातून सांगितले. कर्तबगार महिलांचा सन्मान केल्याबद्दल ‘लोकमत’ला त्यांनी धन्यवाद दिला.दहशतीच्या वातावरणात महिलांनी सजग असावे -प्रभा गणोरकरआज दशहतीचे वातावरण निर्माण झाले असून हे चुकीचे वादळ घोंगावत आहे. ते जवळ आलेले नाही, पण अवकाश आहे. आज सर्वत्र भीती निर्माण झालेली आहे, असा इशारा त्यांनी मार्गदर्शनातून महिलांना दिला. आज कोणतेही क्षेत्र सुरक्षित नाही. सर्वत्र दहशतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. अशातच महिलांना असुरक्षितता जाणवत आहे. मात्र ‘लोकमत’ कर्तबगार महिलांना पुरस्काराने सन्मानित करून त्यांना जगण्याचे बळ देतोय, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.आता फुले-शाहू-आंबेडकरांचे स्वप्न झाले साकार -डॉ. राजेंद्र गवईपूर्वी महिलांना चूल आणि मूल एवढेच हक्क होते. मात्र, आता ते संविधानाने बहाल केले आहे. महिलांना मतदानासोबत मालमत्तेचे अधिकारही मिळाले आहे. त्यामुळे खºया अर्थाने आता फुले, शाहू, आंबेडकरांचे स्वप्न साकार झाले आहे. त्यांनी लहानपणच्या आठवणींना उजाळा देत त्यावेळची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याचे सांगितले. त्यावेळी आईने केलेल्या कष्टाची यशोगाथा मांडताना ते बालवयात हरपून गेले. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.कमलताई गहिवरल्यासन्मानाच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणादरम्यान कमलतार्इंना गहिवरून आले. अन् त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. लोकमतच्या या आयोजनाचे भरभरून कौतुक केले. दर्डा कुटुंबीयांशी असलेले स्नेहबंध त्यांनी उलगडले.