शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
"यांच्या स्वभावातच कोणाची..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
3
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
4
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
5
क्रिकेटच्या मैदानात 'बुद्धिबळातील चाल': टॉम लॅथमच्या विकेटसाठी R Ashwin नं असं विणलं जाळं (VIDEO)
6
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
7
डॉलरची दादागिरी संपुष्टात येणार? भारत-रशिया-चीनने बनवला प्‍लॅन, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ताकदीला आव्हान
8
Waaree Energies IPO allotment status: Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
9
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
10
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
11
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
12
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
13
का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित
14
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
15
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
16
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
17
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
18
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
19
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
20
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल

दोन ठिकाणी कोसळली वीज

By admin | Published: September 09, 2015 12:17 AM

तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह धुंवाधार पावसाला सुरुवात झाली. या वर्षातील पावसाळ्याचा हा अतिशय वेगवान पाऊस ठरला.

जीवहानी नाही : बडनेऱ्यात नारळाच्या झाडावर, करजगावात टॉवरवरचांदूरबाजार : तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह धुंवाधार पावसाला सुरुवात झाली. या वर्षातील पावसाळ्याचा हा अतिशय वेगवान पाऊस ठरला. या पावसाची तालुक्यातील करजगाव मंडळात अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. येथे ७० मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तालुक्यातील सात मंडळांत झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार, तालुक्यात पडलेल्या पावसाची या दिवसाची सरासरी २२.७४ मि.मी. एवढी नोंदविण्यात आली आहे. शहरातही सायंकाळच्या सुमारास काही काळाकरिता गंभीर स्थिती निर्माण झाली होती. तासभर दणकेबाज पावसाने व विजांच्या कडकडाटांनी शहरातील नागरिकांना अक्षरश: वेठीस धरले होते. महसूलच्या स्थानिक नोंदीनुसार शहरात ३४ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी सखल भागात पाणी तुंबल्याची माहिती प्राप्त झाली. तासभर विजांच्या आवाजाने शहरातील नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडाला होता. अशात वीज कोसळल्याने प्रचंड आवाज झाला. त्यामुळे बी.एस.एन.एल.ची फोन सेवा १४ तासांपर्यंत ठप्प पडली होती. ही सेवा मंगळवारी सकाळी १० वाजता पूर्ववत सुरू झाली.महसूल विभागाच्या नोंदीनुसार तालुक्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस, चांदूरबाजार ३४ मि. मी., बेलोरा २२ मि.मी., ब्राम्हणवाडा थडी २८ मि. मी., करजगाव ७० मि. मी., आसेगाव ४.२ मि. मी., शिरजगाव कसबा १ मि. मी. तर तळेगाव मोहना मंडळात पावसाची नोंद निरंक आहे. आठ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नोंदीनुसार तालुक्यात यावर्षी सरासरी ५११.७९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.याच कालखंडात झालेल्या पावसाची सरासरी पाहता तालुक्यात मागील वर्षीपेक्षा १४२.७३ मि. मी. इतका पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळी स्थिती मागील वर्षीच्या दुष्काळापेक्षाही तीव्र असल्याची माहिती शेतकरी वर्गाकडून एकिवात आहे. (शहर प्रतिनिधी)