लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: वाढत्या उन्हामुळे लिंबाचा वापर वाढला असून, अधिक मागणीमुळे लिंबांची किंमत प्रचंड वाढली आहे. त्यामुळे लिंबाना महागाईची झळ, असे म्हणण्याची वेळ आली आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खोल गेली असून विहिरींनी तळ गाठल्यामुळे भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. तसेच लिंबांचे झाडेसुद्धा पाण्याअभावी वाळायला लागले आहे. क्वचित ठिकाणी आवक आहे; मात्र, त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने महागाईची परिसीमा गाठल्याचे चित्र आहे. आवक घटल्याने किरकोळ बाजारात लिंबाचे दर तीन ते पाच रुपये प्रतिनग विक्री होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मार्च ते मे दरम्यान लिंबांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. मात्र, पाण्याअभावी उत्पादनात घट होते. महिनाभरापूर्वी ३० ते ३५ रुपये प्रति किलो विक्री होत असलेले लिंबू आता तब्बल ५० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांना घाऊक बाजारात तीन ते पाच रुपये प्रतिनगाने खरेदी करावे लागत आहेत.लिंबांचे आयुर्वेदात अन्यय साधारण महत्व आहे.पहाटे लिंबू -पाणी पिल्याने पोट साफ होते. लिंबू रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. लिंबू पाण्याच्या सेवनाने उलट्या थांबण्यास मदत होते. लिंबाच्यता सेवनाने रक्त शद्धीकरणात मदत होते. गालावर मुरूम किंवा एक्झिमासारख्या त्वचारोगामध्ये लिंबाचा रस लावल्याने फायदा होतो.मोठ्या लिंबांना अधिक मागणीघाऊक व्यापाऱ्यांकडे मोठ्या आकाराच्या लिंबांची दोन-पाच रुपये प्रतिनग असे दर असूनही त्यांना अधिक मागणी होत आहे. लिंबू सरबत विक्रेते मोठ्या आकाराच्या लिंबांची खरेदी करतात. किरकोळ बाजारात ३ रुपये प्रतिनग असा लिंबाचा दर आहे.मागील महिनाभरापासून लिंबांना अधिक मागणी असून. दरात प्रचंड वाढ झाली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील.- मुन्ना गंगोत्री,व्यापारी
लिंबांना महागाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:04 AM
वाढत्या उन्हामुळे लिंबाचा वापर वाढला असून, अधिक मागणीमुळे लिंबांची किंमत प्रचंड वाढली आहे. त्यामुळे लिंबाना महागाईची झळ, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देमागणी वाढली : भावही वधारले, आवक घटली