मेळघाट व्याघ्र प्रकल्प : १३.५० कोटींचा निधीअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील केलपाणी आणि चुनखडी गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी महसूल व वन विभागाने १३५०.४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २७.६८ वर्ग किलोमीटरची व्यापकता असलेल्या या प्रकल्पात १५०० किलोमीटर कोअर (अतिसंरक्षित) क्षेत्र आहे. ११३ गावे बफर झोनमध्ये असून २२ गावे अतिसंरक्षित क्षेत्रात आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील १४ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. अन्य १९ गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. पुनर्वसन करताना तेथील लोकसंख्येसह अन्य सर्व सुविधाही बाधित होत असतात. जेथे पुनर्वसन करावयाचे आहे तेथे मूलभूत नागरी सुविधा नव्याने कराव्या लागतात. त्याबाबत प्रस्ताव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या यंत्रणेकडून पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)केंद्र पुरस्कृत योजनेतून निधीकेंद्र पुरस्कृत योजना सर्वसाधारण घटक, अनुसूचित जमाती तसेच अनुसूचित जातीकरिता विशेष घटक याअंतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मौजा केलपाणी व चुनखेडी गावांचे पुनर्वसनाकरिता केंद्र शासनाने २९ फेब्रुवारी २०१६ च्या आदेशान्वये २०२५.६० लक्ष वितरित करण्यात आले आहेत. १३.५० कोटींचा निधीकेंद्र शासनाने वितरित केलेला २०.२५ कोटींपैकी ४५० कोटी निधी चुनखेडी व केलपाणी गावांच्या पुनर्वसनाकरिता वितरित करण्यास १९ मार्च २०१६ ला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यापूर्वी ११ जून २०१५ अन्वये मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चुनखेडीच्या पुनर्वसनासाठी ९ कोटी देण्यात आले आहे. एकूण १३.५० कोटींचा निधी ४० टक्के समरुप राज्य हिस्सा म्हणून दर्शविण्यात आला.केंद्र पुरस्कृत योजनेचा निधी ६०:४०केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत नवीन निधी वितरण प्रणाली येण्यापूर्वी पुनर्वसनाकरिता प्राप्त होणारा निधी मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विकास अंतर्गत उपलब्ध करून दिला जात होता. तथापि, नवीन वितरण प्रणालीमध्ये केंद्र व राज्याच्या प्रमाण ६०:४० असे आहे. त्यामुळे आता मंजुरी मिळालेले ४.५० कोटी आणि तत्पूर्वी दिलेले ९ कोटी असा एकूण १३.५० ४० कोटी एक विशेष बाब म्हणून समरुप राज्य हिस्सा म्हणून देण्यात आला आहे.
चुनखडी, केलपाणीच्या पुनर्वसनाचा मार्ग प्रशस्त
By admin | Published: March 22, 2016 12:32 AM