अमरावती - गोडवा जसा बोलणाऱ्यांच्या ओठांवर असावा, तसाच तो त्यांच्या मनातही जपला जावा. यशस्वी आयुष्यक्रमणासाठी या जीवनपद्धतीचा हमखास उपयोग होतो, असा अनुभव घरकुल मसाल्याचे दुसºया पिढीतील युवा उद्योजक तुषार वरणगावकर यांनी व्यक्त केला.स्पष्टवक्ता, थेट मतप्रदर्शन, दुर्मीळ नाणी-वस्तूंच्या संकलनाची आवड जपणारे आणि त्यासाठी जग पालथे घालणारे तुषार म्हणतात, गोड बोलण्यामुळे कुणाचे कधी नुकसान झाल्याचे ऐकले आहे काय? गोड बोलणे, सत्य बोलणे, मनातही गोडवा ठेवणे, या त्रिगुणांच्या कुठल्याही मर्यादा असू शकत नाहीत. प्रभू रामचंद्रांनी स्वआचरणाने त्याचे उदाहरण जगाला घालून दिलेले आहे.रोजच्या जगण्यात आनंद निर्माण करणारी ही सहजसाध्य कला निसर्गत: मनुष्याला प्राप्त झाली आहे. आपण ती विसरता कामा नये. माझ्या उद्योगात मला या गुणांचा झालेला लाभ अतुलनीय आहे. यशाकडे भरधाव सुटलेल्या तरुणाईनेही हे त्रिगुणसूत्र जपल्यास यश आणि आनंद त्यांना कधीच फारकत देणार नाही.तीळ-गूळ हे उष्णतेचे प्रतीक आहे. त्या मिश्रणात उष्णता आहे. तीळ-गुळाच्या सेवनाने शरीरात ऊर्जा संचारते. येणाºया उत्तरायण काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, ही या सणामागची संकल्पना. ही ऊर्जा सकारात्मक आणि विधायक पद्धतीने वापरली जावी, असा संदेश तुषार यांनी तरुणाईला दिला.
ओठांवर असावा तसाच गोडवा मनातही जपावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:33 PM
गोडवा जसा बोलणाऱ्यांच्या ओठांवर असावा, तसाच तो त्यांच्या मनातही जपला जावा. यशस्वी आयुष्यक्रमणासाठी या जीवनपद्धतीचा हमखास उपयोग होतो, असा अनुभव घरकुल मसाल्याचे दुसºया पिढीतील युवा उद्योजक तुषार वरणगावकर यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देतुषार वरणगावकर : यशस्वी युवा उद्योजक