पोलिसांची कारवाई : एकाच दिवशी २३ ठिकाणी धाडसत्रअमरावती : होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपचमी सण असून त्याच दिवशी कर साजरी करण्यात येते. करीच्या दिवशी दारुची विक्री बंद असते, अशावेळीच शहरात अवैध दारूच्या विक्रीला उधाण येते. २३ मार्चला होळी तर २४ मार्चला रंगपंचमी व कर साजरी होणार आहे. मात्र, होळीच्या एक दिवस आधीच लाखोंची दारूची पोलिसांनी जप्त केली आहे. यंदा पोलीस अवैध दारू व्यवसायावर वॉच ठेवून एकाच दिवशी २३ ठिकाणी धाडी टाकून लाखोंचा माल जप्त केला आहे. शहरातील १० पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध परिसरात पोलिसांनी मंगळवारी धाड सत्र राबविले. खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या शिवा शेषराव सरदार, विक्की आठवले, गुल्ला नावाचा मुलगा यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बडनेरा हद्दितील दाभा येथे धाड टाकून पोलिसांनी बळीराम शंकर शेंडेला दारु विक्री करताना ताब्यात घेतले. फे्रजरपुरा हद्दितील परिहार पुऱ्यात बाली भीमराव बेनिवाले याच्याकडे धाड टाकून ३ हजारांची गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे. शिलकरीपुऱ्यातील राजा अजाबसिंग टांक याच्याकडून गावठी दारूचा १३ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. परिहार पुऱ्यातील संतोष भीमराव मोहकार याच्या घरी धाड टाकून साडेचार हजारांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. कुंभारवाडा येथील बयोबाई छोटू चौधरी, रुकसाना युसूफ गोचवाले, बानोबाई भुरु बेनिवाले, मालनबाई बब्बू लुतईवाले यांच्याकडून अवैध दारूचा माल फे्रजरपुरा पोलिसांनी जप्त केला आहे. गाडगेनगर पोलिसांनी संत गुलाबबाबा नगरात धाड टाकून आरोपी लखन प्रताप यादव, विलासनगरातील संतोश विक्रम सांळुके याच्याकडून देशी दारूचा माल जप्त केला. वलगाव पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून अवैध दारूचा माल जप्त केला. त्यामध्ये नया अकोला येथील मंगेश किसन सोळुंकेकडून ६६० रुपयांची दारू जप्त केली.नांदगाव पेठ पोलिसांनीही धाडसत्र चालवून शेंदोळा येथील राजकुमार गोपी राठोडकडून अडीच हजाराची अवैध दारू जप्त केली. एमआयडीसी परिसरातील रामकृष्ण सवई यांच्या चहा कॅन्टींगवरून ७७० रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. त्याचप्र्रमाणे पिंपळझिरा येथील पारधी बेडा येथून शहिदशहा पवारकडून पाच लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. राजापेठ पोलिसांनी चिचफैल येथील रेखा गणेश शितोडेकडे धाड टाकून ५०० रुपयांची अवैध दारू जप्त केली. तसेच जगदीश माणिक सयामकडून ६०० रुपयांची अवैध दारू, दसरा मैदान झोपडपट्टीतून मनोज प्रमोद खंडारेकडून ७०० रुपयांची दारू, वसंतराव नाईक झोपडपट्टीतून द्रोपदा स्वर्गेकडून ८०० रुपयांची दारू, विवेकानंद कॉलनीतील कन्हैय्या गोवरकडून १ हजार ७२५ रुपयांची दारू जप्त केली आहे. त्याप्रमाणे शहर कोतवाली पोलिसांनी खापर्डे बगिच्यात पेट्रोलिंग दरम्यान अब्दुल मोमीन अब्दुल हमिदजवळून ३५ हजारांची अवैध दारू व त्याचा आॅटो जप्त केला आहे. धुळवडीच्याव एकदिवसा आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याचे उघड झाले असून धुळवडीच्या दिवशी तर अवैध दारूच्या विक्रीला उधाण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रंगपंचमीपूर्वीच लाखो रुपयांची दारू जप्त
By admin | Published: March 24, 2016 12:37 AM